प्रतिनिधी आकाश जळके
अंबड - घनसावंगी हायवे लगत मौजे पांगरखेडा येथील सरकारी 🇮🇳 गायरान जमिनी मधील खंडोबा मंदिराच्या टेकडी परिसरात देवराई मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक, विद्यार्थी आणि गावातील वृक्ष मित्रांच्या मदतीने आज मंगळवार दि.09/07/2024 सकाळी 9:30 वा.वृक्षारोपण करण्यात आले.
पांगरखेडा येथील देवराई करिता समस्त महाजन ट्रस्ट, मुंबई यांच्या मदतीने खालील प्रमाणे रोपटे उपलब्ध करून देण्यात आली.
1) लिंब - 40 2) वड - 5 3) करंज - 10 4) आवळा - 10 5) पिंपळ - 20 6) बेल - 15
एकुण - 100 रोपटे लावण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक श्री बाजीराव गाढवे सर सहशिक्षक श्री मोहियोदिन सय्यद, श्री तुकाराम रनमळे, श्रीमती सुषमा गिल्डा, सरपंच श्रीमती सुमन माळी, ग्रामसेवक श्री विशाल नलावडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री दीपक लांडे वृक्ष मित्र श्री नामदेव कोल्हे, श्री विष्णू माळी, श्री विष्णू लांडे, श्री संभाजी लांडे, श्री सचिन लांडे, श्री दिगंबर लांडे, श्री दत्ता लांडे, श्री बंडू सोमवारे असे अनेक नागरिक व विद्यार्थ्यांंची उपस्थिती होती.
श्री रामचंद्र कोल्हे, श्री सतिष कोल्हे आणि श्री नारायण तायडे यांनी जबाबदारीने सर्व शंभर वृक्ष लावून परिश्रम घेतले.
Social Plugin