या द्वारे अंबड शहरातील सर्व महिलांना भगिनींना कळविण्यात येत आहे की, “महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कार्यालय अंबड नगर परिषदे द्वारें शहरात एकूण नऊ केंद्रीय बैठे मदत केंद्रे सुरू करण्यात आलेले आहेत. कार्यालय नगर परिषद अंबड कडून उद्या दिनांक 13.07.2024 या रोजी पासुन या विशेष नोंदणी मोहीम, मार्गदर्शन तथा प्रचार प्रसिद्धी कक्षाचे आयोजन केलेले आहें या मोहिमेच्या माध्यमातुन येणाऱ्या सर्व पात्र लाभार्थीं महिलांना त्यांचे ऑनलाईन फॉर्म विना मुल्य भरून दिलें जाणार आहें. तेंव्हा या योजनेचा जास्तीत जास्त पात्र महिला भगिनींनी आवश्यक कागदपत्रे सादर करून आपापल्या जवळील केंद्रात ऑनलाइन फॉर्म भरून घ्यावें.
अर्जसोबत भरावयाची माहिती / अत्यावश्यक कागदपत्रे
१. आधार कार्डची छायांकित प्रत एकाच पानांवर (दोन्ही बाजूने)
२. अधिवास प्रमाणपत्र. नसल्यास, त्याऐवजी महिलेचे १५ वर्षापुर्वीचे (१) रेशनकार्ड (२) मतदार ओळखपत्र (३) शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व (४) जन्म दाखला या पैकी कोणतेही एक ओळखपत्र / प्रमाणपत्र सादर करावे. (परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत तिच्या पतीचे (१) जन्म दाखला किंवा (२) शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा (३) अधिवास प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक सादर करावे.
३. उत्पन्न प्रमाणपत्र (वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापर्यंत असणे अनिवार्य), तथापि पिवळे व केशरी रेशनकार्ड धारकांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट राहील. त्याकरीता रेशनकार्डाच्या पहिल्या व शेवटच्या पानाची एका पानावर प्रत घेऊन ती अपलोड करावी.
४. अर्जदाराचे नमुन्याप्रमाणे हमीपत्र.
५. बँकेच्या पासबुकची पहिल्या पानाची प्रत अनिवार्य नाही. तथापि, असल्यास अपलोड करावी.
६. फ़ोटो साठी महिला यांनी स्वतः उपस्थित रहावे आणि सोबत आपल्या आधार लिंक असलेला मोबाईल सोबत घेऊन यावे...
स्थळ
1 नगर परिषद इमारत, अंबड (भाजीमंडई जवळील,BSNL टॉवर)2 इकबाल उर्दू हायस्कूल, अंबड (नाथरेकर चौक जवळ)3 जि.प.प्रा.शा. उर्दू, अंबड (भाजीमंडई जवळील,BSNL टॉवर)4 इंदिरा नगर पाण्याची टाकी, अंबड5 नागोबाची वेस (जि.प.प्रा.शाळा), अंबड6 बौद्ध विहार आंबेडकर नगर परिसर, अंबड 7 होळकर नगर सभागृह, होळकर नगर, अंबड 8 आंबेडकर नगर अंगणवाडी आंबेडकर नगर परिसर 9 माळी गल्ली कावंदी गल्ली करिता(मत्स्योदरी इंग्रजी स्कूल) अंबड वेळ सकाळी ठीक 10:00 ते , रात्री 8.00 या वेळे पर्यंत नोंदणी सुरू राहील .
मुख्याधिकारी,
कार्यालय नगर परिषद अंबड,
अंबड, जि. जालना.(महाराष्ट्र)
Social Plugin