गुणवंत राठोड कारंजा प्रतिनिधी
वाशिम जिल्हा अॅथलेटिक संघटना वाशिम व लोकमान्य व्यायाम शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने शतक महोत्सवी वर्षानिमित्त १८ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता स्वर्गीय प्रकाशदादा राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.स्थानिक विद्याभारती कॉलेजच्या मैदानातून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
तीन गटात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, ६ जुलै रोजी सायंकाळपर्यंत ६० इच्छुक स्पर्धकांनी नाव नोंदणी केली असून, जातीत जास्त स्पर्धकांनी आपली नाव नोंदणी करून स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. अजय कांत, डॉ. सुभाष गावंडे, डॉ. राम गुंजाटे, सुनील चवरे व शिवाजी गायकवाड यांनी केले आहे.





Social Plugin