बंडु शिंगटे घुंगर्डे हादगाव
अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथे वार्ड क्रमांक १ व २ मध्ये डीपी जळाल्याने नागरिकांना अंधारात राहावे लागत होते . यामुळे नागरिकांचे हाल होत होती. घुंगर्डे हादगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे ग्रामपंचायत सदस्य राजीव अण्णा कदम यांनी पुढाकार घेऊन आमदार आदरणीय माझी आरोग्य मंत्री राजेश भैय्या टोपे यांना फोन करून तात्काळ कळविण्यात आले की घुंगर्डे हादगाव येथील ट्रांसफार्मर झाल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे. आमदार राजेश टोपे यांनी तात्काळ महावितरण कंपनीला आदेश देऊन दोन तासात घुंगर्डे हदगाव येथील जळलेल्या ट्रांसफार्मर त्वरित बसवण्यात आला
यामुळे घोंगडे हादगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य राजीव अण्णा कदम व आमदार राजेश भैय्या टोपे यांचे अभिनंदन करून त्यांना धन्यवाद देण्यात आले यामुळे गावकऱ्या त आनंदाचे वातावरण दिसून येत आहेत. या कामासाठी ग्रामपंचायत सदस्य कदम यांनी पुढाकार घेऊन डीपी बसण्यात आली त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे या कामासाठी सहकार्य करणारे ह भ प परभतसिंग महाराज परिहार, अर्जुन सिंग महाराज परिहार, अण्णा बन, बद्री सिंग परीहार, रवी परिहार, श्याम परिहार, शेख, बळीराम सिंग परिहार, विठ्ठल खापरे, राम परिहार, व ग्रामपंचायत सदस्य राजीव अण्णा कदम यांनी परिश्रम घेतले. महावितरण कंपनीचे कर्मचारी रणमाळे साहेब, किशोर पवार आदी उपस्थित होते





Social Plugin