( प्रतिनिधी )ईश्वर पवार
पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी आपापल्या क्षेत्रात,गावात वृक्षारोपण करून किमान 200 झाडे तरी लावावे असे आव्हान जिल्हा परिषद वाशिम चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मा.वाघमारे साहेब यांनी केले आहे
निसर्ग माणसाला खूप काही देत असतो याची जाण ठेवून निसर्गाचे देण आहे या कृतज्ञ च्या भावनेतून ग्रामपंचायत वसंतवाडी सरपंच सौं. नंदिनी विनोद राठोड ग्रामसेवक इंगोले मॅडम तसेच ग्रामपंचायत इतर पदाधिकारी व गावातील वरिष्ठ, जेष्ठ नागरिक व जि.प. प्राथमीक मराठी शाळा वसंतवाडी शिक्षक व विद्यार्थी या सर्वांनी पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन व्हावे म्हणून शाळा व ग्रामपंचायत परिसरात जवळपास 500 ते 700 झाडे लावून आज वृक्षारोपण कार्यक्रम साजरा करण्यात आला
लोकसहभागातून वेळोवेळी वृक्ष लागवडीचे लक्ष पूर्ण करू असा विश्वास गावाचे सरपंच व इतर पदाधिकारी यांनी व्यक्त केला यावेळी जि प शाळेचे शिक्षक, गावातील प्रतिष्ठित मंडळी हजर होते वृक्ष लागवड ही व्यापक चळवळ झाली असून, जगा,जगवा जगू द्या जीवनमंत्र आत्मसात करून वृक्षारोपण मोहिमेत सामाजिक बांधिलकीतून सहभागी व्हावे असेही ते म्हणाले या उपक्रमात सर्व गावकऱ्यांनी ग्रामपंचायत वसंतवाडी यास सहकार्य केल्याबद्दल कौतुकही केले
याप्रसंगी ग्रामपंचायतचे सरपंच नंदिनी विनोद राठोड, उपसरपंच गोपाल जाधव ग्रामसेवक इंगोले मॅडम, ग्रामपंचायत कर्मचारी मंगल चव्हाण, रोजगार सेवक राजेश आडे, योगेश भाऊ राठोड,संदीप रमेश जाधव, ईश्वर पवार अंगणवाडी सेविका, शाळेतील विद्यार्थी व गावकरी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे नियोजन जि प शाळा वसंतवाडी चे शिक्षक व विद्यार्थी मंडळी यांनी केले.
Social Plugin