बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ] .
मानवी स्वभाव हा गुंतागुंतीचा आहे. तो चंचल आहे तसाच तो वाईट आणि चांगलाही असल्याचे मत ह .भ .प. भ सुनील धोंगडे महाराज यांनी व्यक्त केले. भाळवणी तालुका पंढरपूर येथे श्री सेवागिरी महाराज दिंडी मुक्कामी कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी देवस्थान ट्रस्टचे मठाधिपती श्री महंत सुंदरगिरी महाराज, चेअरमन रणधीर शेठ जाधव, माजी चेअरमन डॉ . सुरेश जाधव, बाळासाहेब जाधव, विश्वस्त संतोष वाघ , सचिन देशमुख, गौरव जाधव आणि भाविक उपस्थित होते. यावेळी कीर्तनात बोलताना धोंगडे महाराज पुढे म्हणाले, ज्याप्रमाणे कुत्र्याचे शेपूट नळी मध्ये घातले तरी सरळ होत नाही त्याचप्रमाणे वाईट माणसाचा स्वभाव सहजासहजी बदलत नाही.
संत महात्म्यांचा स्वभाव मुळातच देव भावी असल्याने त्यांच्यावर कितीही वाईट वृत्तींचा मारा झाला तरी त्यांच्या स्वभावामध्ये बदल होत नाही. वारकरी संप्रदायातील अनेक संतांनी पंढरपूर च्या विठोबाची वारी करीत मनुष्य स्वभावामध्ये भाविकता, श्रद्धाळूपणा व भक्ती मार्गाचे रस भरण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी धोंगडे महाराजांनी अनेक मानवी गुणवैशिष्ट्यांचा उदाहरणासह दाखला उपस्थिती त्यांना दिला. सदर वेळी सुंदरगिरी महाराजांच्या हस्ते दानशूर विनायकराव काळे यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास माजी चेअरमन गुलाबराव वाघ, दिलीपराव जाधव, सुभाषराव जाधव, विठ्ठलराव तोडकर ,गिरीश कुलकर्णी, नितीन राव जाधव ,उमेश मखरे, रामचंद्र माने, डॉक्टर विक्रांत जाधव, डॉक्टर सविता वाघ, पंचायत समिती सदस्य नीलादेवी जाधव, डॉक्टर मीनल जाधव, सुसेन जाधव, चंद्रकांत जाधव आणि वारकरी उपस्थित होते.
Social Plugin