बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
सन 2024 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक परीक्षेत बुध ता . खटाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा विद्यार्थी पुष्कराज समीर देसाई ग्रामीण सर्वसाधारण गुणवत्ता यादीत J142/269 क्रमांकाने शिष्यवृत्तीधारक झाला ,तर एकूण 14 विद्यार्थी परीक्षेत पात्र झाले .पर्णवी दयानंद जगदाळे ,तन्मय महेश काटे,रिया गणपत जगदाळे ,अर्णव अमर फरकूटे , तर200च्या वर 5 विद्यार्थी आयुश्री शरद सातपुते, जान्हवी सागर कारंडे ,अर्णव सुरेंद्र दळवी ,मनस्वी नाना बोराटे ,विराज राहुल जगदाळे ,अंकिता महेश जंगम ,श्रेया विकास त्रिपुटे ,अनिकेत शशिकांत बागेकरी, राधीका दीपक पाटील यांनी उल्लेखनीय यश मिळवले .अतिरिक्त पूरक मार्गदर्शन, अचूक प्रश्नपत्रिकांचा सराव, रात्रअभ्यासिका इ मुळे जास्तीजास्त विद्यार्थी पात्र करता आले असे मत मार्गदर्शक शिक्षक श्री नितीन घनवट व श्री संग्राम कांबळे यानीं सांगितले तसेच मुख्याध्यापक जितेंद्र जगताप ,दत्तात्रय जाधव , सौ दमयंती अब्दागिरे, सौ उमा रणसिंग ,सौ दिपाली घनवट सौ अनिता मोरे, यांनीही विशेष परिश्रम घेतले .
शाळेचा उज्ज्वल इतिहास निर्माण करून घवघवीत यश मिळवल्याबद्दल विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे बुध गावच्या सरपंच सौ सुजाता बोराटे , उपसरपंच तसेच शा व्य समिती अध्यक्ष ,नियोजन समिती सदस्य अभयसिंह राजेघाटगे ,शिक्षण सहसंचालक दिलीप जगदाळे, गटशिक्षणाधिकारी श्रीमती प्रतिभा भराडे , विस्ताराधिकारी सौ सोनाली विभुते , गायकवाड मॅडम , माजी केंद्रप्रमुख प्रमोद जगदाळे , एस के जाधव ,के डी पवार, खटाव तालुका शिक्षक समितीचे अध्यक्ष आबासाहेब जाधव ,प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक नवनाथ जाधव , ग्रा पं सदस्य जयवंत जगदाळे , राजुल बोराटे पत्रकार प्रकाश राजेघाटगे, गणेश सातपुते श्री कल्याण जगदाळे ,एच डी जगदाळे , विकास त्रिपुटे , वैभव लोहार ,शा व्य समिती सदस्य सौ श्रद्धा पवार, दयानंद जगदाळे आदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या





Social Plugin