Ticker

6/recent/ticker-posts

रमेश उबाळे यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी


आ.महेश शिंदे गटात जाणार की, मागासवर्गीय नेत्याच्या पार्टीत जाणार? राजकिय वर्तुळात चर्चा 

बुध दि .[ प्रकाश राजेघाटगे ]

 राष्ट्रवादी  जिल्हा सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष रमेश उबाळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने कोरेगाव सातारा खटाव विधानसभा मतदार संघासह जिल्ह्यात  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष  शरदचंद्र  पवार गटाला  मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. नुकत्याच  झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने  सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विचारात न घेतल्यामुळे पराभवाला सामोरे जावे लागले या कारणास्तव रमेश उबाळे यांनी राजीनामा दिल्याचे रमेश उबाळे म्हणाले रमेश उबाळे यांनी पुढील राजकिय भूमिका जाहीर केली  नसलीतरी   ते  पूर्व अश्रमी आ.महेश शिंदे गटात जाणार की   मागासवर्गीय समाजाला न्याय देण्यासाठी मागासवर्गीय नेत्याच्या पार्टीत जाणार याची जोरदार चर्चा आता राजकिय वर्तुळात आहे

     आ. शशिकांत शिंदे यांचा नामोल्लेख टाळून रमेश उबाळे पुढे म्हणाले,मागासवर्गीय तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणं नेत्यांना शक्य झालं नाही कायम गृहीत धरून राजकारण करण योग्य नाही स्वाभिमानी नेते व मतदार अजून शिल्लक आहेत याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे याआधी विविध प्रश्नांकरिता आंदोलने व आमरण उपोषण करून माझ्या मागासवर्गीय समाजाला मी न्याय मिळवून दिला आहे साठ वर्षाचा प्रलंबित प्रश्न भीम नगर रेल्वे यामध्ये गेलेली जमीन त्या बदल्यात मोबदला मिळाला नव्हता त्यासाठी मोठं आंदोलन करून वेळे प्रसंगी स्वतःच्या जीवाची ही पर्वा केली नाही पण माझ्या मागासवर्गीय बांधवांना न्याय मिळवून दिला सिद्धार्थ नगर येथील मागासवर्गीयांना पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांना धारेवरती धरून आंदोलनाचा इशारा दिला व पाठपुरावा करून पाण्याचा प्रश्न मार्गी लावला याआधीही भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस म्हणून काम करत असताना युवकांना कॉलेजला व परीक्षेला जात असताना एस .टी. उपलब्ध होत नव्हत्या याकरिता मोठे आंदोलन करून त्रिपुटी ते कोरेगाव रस्ता रोको करून चक्काजाम केला व सर्वसामान्य शेतकरी व कष्टकरी पालकांच्या युवकांना न्याय मिळवून दिला मागासवर्गीय समाजाचे वेळोवेळी प्रश्न मार्गी लावले माझ्याकडे कोणताही व्यक्ती अडचण प्रश्न घेऊन आल्यास मी त्याला त्याची जात त्याचा पक्ष विचारत नाही आपण फक्त आपलं काम सांगा की काम करून द्यायची जबाबदारी माझी तेही कोणाचा साधा चहा सुद्धा न घेता राजकारण समाजकारण करत असताना कायम अर्थकारणाला बाजूला ठेवून फक्त न्याय मिळवून देण्याची भूमिका कायमच माझी राहिली आहे मी कोणत्या पक्षात काम करतोय यापेक्षा माझ्या मागासवर्गीय बांधवांचे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न कशा पद्धतीने सोडवता येतील याचाच विचार करून मी काम करत असतो.

 माझ्यासाठी कोणताही पक्ष व कोणताही नेता मोठा नाही मी माझ्या आयुष्यात दोनच गोष्टींना स्थान दिला आहे एक म्हणजे भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधान याव्यतिरिक्त मी कशालाच फार महत्त्व देत नाही   मी माझ्या समाजासाठी काम करेल यापुढे पक्ष व नेत्यापेक्षा माझ्या समाजातील अडचणी काही प्रश्न असतील ते मार्गी लागेल व कोणी माझ्या सर्वसामान्य मागासवर्गीय बांधवावरती अन्याय करत असेल तर त्याला धडा शिकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही पक्ष राजकारणापेक्षा समाजाला महत्त्व देणं समाजासाठी काम करणं याच गोष्टींना मी क्रमवार प्राधान्य देत असतो आज दिलेला मी राजीनामा हा कोणत्याही वैयक्तिक कारणाने नसून आम्हाला डावलने आम्हाला गृहीत धरणे दुर्लक्षित करणे मानसन्मान वागणूक फारशी न मिळणे तळगळतील वाड्या वस्त्यांपर्यंत न जाता फक्त इलेक्शन मतदानासाठीच आम्हा लोकांची आठवण येणं कितपत योग्य आहे त्यामुळे मी हा राजीनामा दिलेला आहे ज्याचा कोणीही गैर अर्थ काढू नये मी माझा समाज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पेक्षा माझ्यासाठी कोणताही पक्ष नेता मोठा नाही इथून पुढेही माझ्या समाजाची सेवा मी करेन हे प्रसंगी आंदोलने उपोषणे जीवाची परवा न करता काम करणार माझ्या समाजाला न्याय देण्याची भूमिका व अन्याय करणाऱ्याला ठेचायची भूमिका कायम राहणार आहे यासाठी कोणत्या पक्षात जायचं का सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करायचं हे योग्य वेळ आल्यास आम्ही ठरवू माझ्यासोबत तमाम मागासवर्गीय बांधव आहेत माझे कार्यकर्ते आहेत जी खऱ्या अर्थाने माझी ऊर्जा आणि शक्ती आहे त्यांच्यासोबत राहून इथून पुढे मी वाटचाल करेल सातारा जिल्ह्यामध्ये कोणत्याही माझ्या मागासवर्गीय बांधवाला अडचण असल्यास कोणी नाहक त्रास देत असल्यास अन्याय करत असल्यास मला दूरध्वनीवरून संपर्क साधावा असेही मी आव्हान करतो माझा मोबाईल नंबर 9850648502/9422402605 हा आहे आपण कधीही मला फोन करू शकता आपल्या लोकांसाठी मी माझं आयुष्य समर्पित करत आहे आपला लहान भाऊ म्हणून आपला घरातला माणूस म्हणून आपला म्हणून आपण हक्काने मला भेटू शकता फोन करू शकता मी कायम आपल्या सोबत असणार आहे आपल्या सोबत राहणार आहे एवढेच मी सांगतो या राजीनाम्याचा फार गवगवा न करता चर्चा न करता आपण नव्या जोमाने कामाला लागू आपल्या समाजातील प्रश्न सोडवू एवढेच मी दैनिकांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो पूर्वी हे आपण मला ताकद दिली माझ्या सोबत राहिलात यापुढेही आपल्या आशीर्वाद आपली साथ आपली ताकद माझ्या पाठीशी राहू दे मी नक्कीच आपल्या सर्वांचे प्रश्न मार्गी लागेल एवढेच बाबासाहेबांना व संविधानांना स्मरून सांगतो आपण माझ्या सोबत राहा मी आपल्या सोबत आहे. असेही ते यावेळी म्हणाले. 

    रमेश उबाळे यांनी आत्तापर्यंत अनेक आंदोलन केली आहेत. ल्हासुर्णेचे पोल्ट्री हटाव आंदोलन, विद्यार्थ्यांना वेळेवर एस.टी. बस मिळावी म्हणून केलेले चक्का जाम आंदोलन, कोरेगाव नगर पंचयतीविरुद्ध केलेले उपोषण , हंडा।मोर्चा आंदोलन  सर्वच  आंदोलनाची प्रशासकीय पातळीवर चर्चा झाली. सातारा-पंढरपूर, सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या कामात राहिलेल्या त्रुटी, ठेकेदारानी केलेला भ्रष्टाचार त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून लोकांसमोर आणला.  रमेश उबाळे यांनी केलेल्या आंदोलनामुळे मोठमोठ्या अधिकाऱ्यांन जबाब देण्यासाठी साताऱ्यात जिल्ह्याधिकारी कार्यालयात यावे लागले. रमेश उबाळे यांच्या आंदोलनात मोठी ताकद असल्याची चर्चा कोरेगाव विधानसभा मतदारसंघात तसेच जिल्ह्यात असते.

     

       २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी  भारतीय जनता पार्टी त आ.महेश शिंदे यांचे समर्थक म्हणून काम करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात जोरदार रान उठवत आ. शशिकांत शिंदे यांच्या राजकारणातलय उणिवा जनतेसमोर आणून राजकिय वातावरण कलुषित केले होते. आ.महेश शिंदे यांना विजयापर्यंत पोहचवण्यात रमेश उबाळे यांनी  महत्वपूर्ण भूमिका बजावल्याची चर्चा होती.  त्यांनी नुकताच जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने आता राजकिय क्षेत्रात  खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. आ.महेश शिंदेंशी आजही त्यांचे। मैत्रीचे संबंध असल्याने ते पूर्वाश्रमी जाणार की एखाद्या मागासवर्गीय नेत्याच्या पार्टीत जाणार? याची उत्सुकता लागलो आहे.