Ticker

6/recent/ticker-posts

शासनाच्या निधीची वाट न पाहता ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या सहकार्यातून काम सुरू

 


बुध  दि .[ प्रकाश राजेघाटगे ]  

खटाव तालुक्यातील काटेवाडी गावासाठी अनेक वर्षापासून रखडलेल्या कामासाठी शासनाच्या निधीची वाट न पाहता ग्रामपंचायत  व ग्रामस्थांच्या सहकार्यातून    काम सुरू करून आदर्श निर्माण केला आहे .                   ग्रामपंचायत काटेवाडी तसेच सर्व ग्रामस्थ  यांच्या सहकार्याने वर्षानुवर्षे रखडलेले काम आज मार्गी लागले. गावच्या कमानीतून  आत गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने असणारे नाले व लोकवस्तीचे सांडपाणी यामुळे गावाच्या आरोग्यावर तसेच लोकांना होणारा त्रास यावर शासन प्रशासनाची वाट न पाहता ग्रामपंचायत ग्रामनिधी व ग्रामस्थांच्या लोकवर्गणीनुन 2 लाखापर्यंत कामाला सुरुवात केली . या कामाचा शुभारंभ उपसरपंच वैभव कोरडे यांनी नारळ फोडून केला . यावेळी सरपंच सौ . शुभांगी कोरडे , ग्रामपंचायत  सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. दिवसभर तरुण वर्ग व जेष्ठ ग्रामस्थ  यांचे शारिरीक श्रमदान ही या कामात लाभले .