Ticker

6/recent/ticker-posts

विशाल भोसले यांना रिपब्लिकन योद्धा हा पुरस्कार



 बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ] 

ललगुण गावचे  सुपुत्र,सातारा आयटी सेलचे जिल्हा अध्यक्ष  विशाल भोसले यांना रिपब्लिकन योद्धा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आं )  पक्षाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष व सातारा जिल्हा अध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ आणि महाराष्ट्र संघटक कैलास जोगदंड यांच्या हस्ते देण्यात आला.यावेळी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

काही वर्षांपूर्वी या कार्यकर्त्याने ललगुन गावातून ही चळवळ सुरु केली.हळूहळू ही चळवळ गावागावांतून तालुक्यात पोहचली.तालुक्यातल्या त्यांच्या या समाजकार्याने त्यांना तालुका अध्यक्ष हे पद मिळवून दिले.प्रत्येक तालुक्यातील माहिती व  पदाधिकाऱ्यांची पकड  घेत जिल्ह्यातील माहिती संकलन कार्य सुरु केले.सातारा जिल्हा व इतर जिल्ह्यांची घडामोडी ते सर्वात प्रथम सातारा जिल्ह्यामध्ये व महाराष्ट्रभर प्रसारित करीत, त्यांच्या या कार्याची दखल घेत दादासाहेब ओव्हाळ व अमित मोरे यांनी त्यांना माहिती प्रसारण( IT सेल)चे जिल्हा अध्यक्ष या पदावर नियुक्त केले.

त्यांच्या या सततच्या सखोल कार्यप्रणालीची   माहिती घेऊन दादासाहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने   प्रोत्साहनपर  विशाल भोसले यांना रिपब्लिकन योद्धा हा पुरस्कार देऊन सन्मानित  करण्यात आले.