काळंगे माध्यमिक विद्यालयाचा उपक्रम; पर्यावरणाच्या संवर्धनासाठी प्रयत्न
बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन हा हेतू डोळ्यासमोर ठेऊन मोळ (ता. खटाव) येथील गुरुवर्य गणपतराव काळंगे माध्यमिक विद्यालयाने एक हजार सीडबॉलचे रोपण केले. उन्हाळी सुटीत आणि शाळा आरंभी सर्व विद्यार्थ्यांमार्फत बिया गोळा करून त्याचे एक हजार सीडबॉल तयार करण्यात आले. हे
सीडबॉल चांगले सुकल्यानंतर या सीडबॉलचे रोपण विद्यालयाच्या परिसरात, रस्त्याच्या दुतर्फा मोकळ्या जागेत तसेच विद्यार्थ्यांच्या घराच्या परिसरात करण्यात आले. करंज, बाभूळ, लिंब, जांभूळ, खैर, गुलमोहर, चिंच अशा अनेक जंगली झाडांच्या बियांचे रोपण सीडबॉलच्या साह्याने करण्यात आले.
प्रत्येक वर्षी विद्यालय हा उपक्रम मुख्याध्यापक संजय गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवत असते. मागील वर्षी मुख्यमंत्री 'माझी शाळा, सुंदर शाळा' या उपक्रमातही विद्यालयाने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. या उपक्रमासाठी श्री भैरवनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष काळंगे, सर्व संचालक मंडळ, सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य व ग्रामस्थांनी दिल्या.
Social Plugin