प्रतिनिधी-संजय भरदुक
मंगरूळपीर --जम्मू कश्मिर मधील पवित्र स्थान अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली असून शिवभक्तांच्या उत्साहाने अमरनाथ यात्रा सध्या भक्तीच्या परमोच्च शिखरावर पोहोचली आहे .या यात्रेसाठी तालुक्यातील शेलुबाजार येथून ८७ शिवभक्त पवित्र अमरनाथ यात्रेसाठी १२ जुलै रोजी रवाना झाले.
अमरनाथ यात्रा ही देशातील सर्वाधिक कठीण यात्रेपैकी यात्रा समजली जाते.प्रतिकुल हवामानात १५ ते १७जुलै च्या दरम्यान सर्व शिवभक्त ही यात्रा पायी पूर्ण करणार आहेत. या यात्रेसाठी तालुक्यातील शेलुबाजार,येडशी,सोनाळा,मसोला, जांब,हिरंगी,गोगरी, पेडगाव, शेंदूरजना मोरे,तर्हाळा, चिखली,नागी,सोयता, मंगरूळपीर, मालेगाव,किन्हीराजा, कारंजा, कामरगाव,अकोला, मोर्शी, या गावातील मिळून एकूण ८७ सदस्य शिवभक्तांचा समावेश आहे.
Social Plugin