नांदेड प्रतिनधी /भारत वानरे
पुजा हेल्थकेअर सेंटर सिडको नांदेड चे संचालक निसर्गोपचार तज्ञ डॉ संभाजी पवार आणि त्यांच्या टीम द्वारे सासवड येथे गुडघे,कंबर दुखी या आजारावर दि.2 आणि 3 जुलै 2024 रोजी दोन दिवसांचे मोफत उपचार शिबिर संपन्न.दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा सासवड येथे डॉ.संभाजी पवार आणि त्यांच्या टीम द्वारे भाविकांच्या सेवेसाठी सासवड येथे दोन दिवसांचे मोफत उपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते जवळपास दोन हजार भाविक रुग्णांनी गुडघे कंबर दुखी या आजारावर मोफत उपचार करून या शिबिराचा लाभ घेतल्याची माहिती डॉ. अवधुत पवार यांनी दिली आहे.
हडसर पुणे ते सासवड हा माऊलीच्या पालखीच्या मार्गातील मोठा टप्पा असतो. या मार्गात दिवेघाट हा सरळ चढतीची रस्ता चालणाऱ्या मध्ये वयस्कर महिला पुरुष असतात त्यांना गुडघे कंबर दुखी चा त्रास संभवतो म्हणून दर वर्षी डॉ. संभाजी पवार, अवधुत पवार यांच्या मार्फत अश्या शिबिराचे आयोजन करण्यात येते.
या वर्षी गुडघे कंबर दुखी या आजारावर मोफत सूजोक, अकुप्रेसर ,मसाज , निसर्गोपचार पद्धती ने जवळपास दोन हजार भाविक रुग्णांच्या दुखण्यावर वीलाज करण्यात आले.या साठी नरेद्रसिंघ ग्रंथी , बाळासाहेब पवार , डॉ प्रविण जाधव , उधव काकडे , अशोक जाधव , उधव जाधव , आकाश चिलगर , आकाश जाधव, अल्केश भोसीकर राजू सेंनगावकर यांनी मोलाचे सहकार्य केले.






Social Plugin