प्रतिनिधी आकाश जळके अंबड
शासकीय जंगलाखाली असणारे भूक्षेत्र वाढावे या साठी मोठ्या पातळीवर वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेतले जातात. पूर्वी या वृक्षारोपण कार्यक्रमामुळे सुबाभूळ, गुलमोहोर, निलगिरी अशी परदेशी झाडे भारतात लावली गेली. या झाडांची आपल्या स्थानिक पक्ष्यांना सवय नसल्याने या झाडांचा अथवा या झाडांची पाने फुले फळे यांचा वापर भारतीय पक्षी करत नाहीत. कालांतराने शासकीय यंत्रणेला या वृक्षारोपण कार्यक्रमातील त्रुटी लक्षात आल्या. सध्या भारतातील स्थानिक प्रजातींची लागवड करण्याकडे सर्व शासकीय यंत्रणा तसेच गैर सरकारी संस्थांचा कल आहे.
या अनुषंगाने समस्त महाजन ट्रस्टच्या वतीने मत्स्योदरी इंग्लिश स्कूल अंबड येथे वृक्ष रोपण करण्यात आले.
6 जुलै रोजी मत्स्योदरी इंग्लिश स्कूल, अंबड येथे समस्त महाजन ट्रस्ट च्या नूतन देसाई मॅडम यांच्या हस्ते व्रुक्षरोपण करण्यात आले . याप्रसंगी मुख्याध्यापिका वरखडे मॅडम , सामाजिक कार्यकर्ते देवा चित्राल सर, वैद्य सर, सामाजिक कार्यकर्ते आकाश जळके व शिक्षकवृंद यांंनी सहकार्य केले.





Social Plugin