Ticker

6/recent/ticker-posts

बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा



पाटण (दिनकर वाईकर) 

     पाटण तालुक्यातील     शेतक-याच्या सुख दुःखात सदैव साथ देणारा जीवाभावाचा सोबती खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची संपत्ती म्हणजे अर्थातच बैल. कृषी प्रधान संस्कृती जोपासणाऱ्या महाराष्ट्रात दरवर्षीप्रमाणे बेंदूर सण मोठ्या उत्साहात  साजरा केला जातो   पाटणसह तालुक्यात बेंदूर सण उत्साहात साजरा करण्यात  .आला  बैलाच्या अंगावर नक्षी काढून , शिंगाला गोंडे लावून ,  बाशिंग बांधून , झोल घालून बैलांना मोठ्या प्रमाणात सजवण्यात आले होते . पाटणसह   ग्रामीण भागातून बैलांची गावातून वाजत गाजत  मिरवणूक काढण्यात आली . तर 

पाटण शहरातील बैलांची मिरवणूक लायब्ररी चौक , मुख्य बाजारपेठ  ,झेंडा चौक  ,जुने बस स्थानक , नवीन बस स्थानक , रामापुर या मार्गांवर वाद्याच्या गजरात बैलांची मिरवणूक काढण्यात आली    . लहान मुलांपासून वयोवृद्ध मोठ्या उत्साहात यावेळी  मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते         .

बेंदूर सणाच्या आदल्या दिवशी पासून बळीराजांनी बैलांचे खांदे मळनी करून  सकाळी   बैलांना स्वच्छ धुवून शिंगे व  अंगावर नक्षीकाम करण्याची दुपारपर्यंत तयारी  सुरू होती त्यानंतर  बाशिंग गोंडे झूल  घालून सजवण्यात आले होते तसेच    प्रत्येक घरात मातीच्या बैलांचीही  पूजा करण्यात आली बैलांची पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य करून  बेंदूर सहन तालुक्यात मोंठ्या   उत्साहात साजरा करण्यात आला