प्रतिनिधी दीपक गुरव@ चाळीसगाव
चाळीसगांव :- तुषार चव्हाण या वाळूमाफीयाला वाळूची वाहतुक करण्यासाठी ट्रॅक्टर न दिल्याच्या रागातून त्याच्या गुंडांनी तरवाडे ता. चाळीसगांव या गांवाचे माजी उपसरपंच आणि ग्रामपंचायतीचे माजी सदस्य ज्ञानेश्वर आनंदा शिंदे यांना त्यांच्यासह त्यांचा मुलगा पंकज यास २० जुलैला रात्री ९.३० वाजता त्यांच्या तरवाडे गांवाच्या शिवारातील शेतामध्ये अनधिकृतरित्या प्रवेश करून लोखंडी रॉड व लाकडी दंडुक्याने बेदम मारहाण केली. या मारहाण प्रकरणी विठ्ठल नारायण कोळी, जगदीश अभिमन कोळी, शिवाजी ओंकार कोळी, भगवान नारायण कोळी, अनिल नारायण कोळी, विशाल विठ्ठल कोळी, योगेश विठ्ठल कोळी, भुषण विठ्ठल कोळी सर्व रा.तरवाडे ता. चाळीसगांव यांच्या विरोधात चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११८ (१), ११५ (२), ३२९ (३), ३५१ (२), ३५२, १८९ (२), १९१ (२), १९१ (१) व १९० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण करणारे तुषार चव्हाण या वाळू तस्करीशी संबंधीत इसमाचे लोक असून ते गांवातल्या लोकांचे ट्रॅक्टर भाड्याने घेवून या ट्रॅक्टर मधुन दिवस-रात्र रहिपुरी ता. चाळीसगांव येथील गिरणा नदीपात्रातून वाळूची बेकायदा वाहतुक करतात. जर एखाद्या शेतकऱ्याने त्यांना बेकायदा वाळू वाहतुकीसाठी आपले ट्रॅक्टर रात्रीच्या वेळी दिले नाही तर ते त्या शेतकऱ्याला दमबाजी तर करतात, प्रसंगी मारहाण देखील करतात.
रहिपुरी येथून दररोज रात्री गिरणा नदीपात्रातूनउत्खनीत करण्यात आलेलीवाळू तुषार चव्हाण व त्याच्या वाळू तस्करीशी संबंधीत लोक ट्रॅक्टरद्वारे वाहतुक करतात. ही वाळू वाहतुक तरवाडे, खरजई येथून रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत सुरू असते. या वाहतुकीला म्हणजेच गौण खनिज चोरीला पायबंद बसावा अशी मागणी या परिसरातील नागरीकांची असूनही तहसिलदार चाळीसगांव तसेच पोलीस आणि महसुल विभागाचे कर्मचारी कोणतीही कारवाई करत नाहीत. टाकळी प्र.चा. येथील गणेश पंडीत ऊर्फ लंगडा आबा आणि त्याचे इतर साथीदार देखील या अवैध वाळू वाहतुकीशी संबंधीत आहेत, ते देखील रात्रीच्या वेळी रहिपुरी येथून ट्रॅक्टरद्वारे वाळू आणतात आणि या वाळूची विक्री चाळीसगांव येथे करतात. वाळू तस्करांचा आणि त्यांच्या गुंडांचा बंदोबस्त व्हावा यासाठी आता तरवाडे येथील ग्रामस्थ एक झाले आहेत. लवकरच या विषयाच्या अनुषंगाने ग्रामसभा देखील घेतली जाणार आहे.





Social Plugin