Ticker

6/recent/ticker-posts

कृष्णात उल्हाळकर यांचा अपघातात मृत्यू



बुध   दि .[ प्रकाश राजेघाटगे ]

सातारा - पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील नेर फाटा ता. खटाव येथे कृष्णात दगडू उल्हाळकर (वय ५५) यांच्या दुचाकीला पाठीमागून अनिल नंदकुमार बोडके यांच्या स्विफ्ट गाडीने मागून धडक दिली. या भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला. कृष्णात उल्हाळकर हे नेर विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन होते.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, शनिवारी दि. २७ रोजी दुपारी - सव्वा चारच्या सुमारास सातारा-पंढरपूर - राष्ट्रीय महामार्गावरील नेर फाटा येथे श्री कृष्णात दगडू उल्हाळकर हे हिरो होंडा डिलक्स गाडी (क्र. एम.एच. ११ सी.ई. ४२६५) वरून पुसेगाव बाजूकडून नेर बाजूकडे चालवत घेऊन जात होते. दरम्यानच्या कालावधीत अनिल नंदकुमार बोडके (रा. पुसेगाव) स्विफ्ट गाडी (क्र एम.एच.११ बी.व्ही. ५७३१) घेऊन पुसेगावकडून सातारच्या दिशेने जात होते. त्यांचे ताब्यातील स्विफ्ट कार ही रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवून कृष्णात उल्हाळकर यांच्या डिलक्स दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत त्यांचा मृत्यू झाला असल्याची फिर्याद प्रदीप रामचंद्र उल्लाळकर यांनी पुसेगाव पोलीस ठाणे मध्ये दिली आहे. या घटनेचा तपास सहाय्यक फौजदार एस.जे. शिंदे करत आहेत.