Ticker

6/recent/ticker-posts

कृषिदुतांनी दिले राजापूर येथे NSKE ( निंबोळी अर्क) निर्मितीचे प्रात्यक्षिक.


बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे] 

खटाव तालुक्यातील राजापूर येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी सलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषिदुतांनी "ग्रामीण जागरूकता कृषि कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प 2024- 25"कार्यक्रमांतर्गत गावातील शेतकरी बांधवांना दिले NSKE ( निंबोळी अर्क)  बनवण्याचे प्रात्यक्षिक. किडींचे सेंद्रिय नियंत्रण व रस शोषक किंडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जसेकी मावा, तुडतुडे, पांढरी माशी, बिटल , अळ्या, फुलपाखरू आणि पतंग , सुरवंट, खोड कीड , बग आणि हॉपर्स, प्रौढ बिटल, फळ माशी, स्केल कीटक, मिली बग यांचे नियंत्रणासाठी NSKE ची फवारणी केली जाते इ.असे महत्व शेतकऱ्यांना पटवून देण्यात आले.

या कार्यक्रमासाठी श्रीरंग घनवट (सर), अमोल झगडे, बाबु घनवट, रोहिनी घनवट, कविता बोराटे, प्रनोती मदने, गजानन घनवट व इतर शेतकरी उपस्थित होते. कृषिमहाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू.डी.चव्हाण सर व श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस. डी.निंबाळकर सर, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे सर, कार्यक्रम अधिकारी नितिषा पंडित, प्रा. संजय अडत सर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदुत अथर्व देवकर , यश निकम , रोहन बरबोले ,पुष्कर बिसेन , सत्यजित धायगुडे , सुयोग भोसले , व साहिल भोसले यांनी हा उपक्रम पार पडला.