Ticker

6/recent/ticker-posts

वाई-खंडाळा-महाबळेश्वर साठी 18 कोटी 34 लाख रुपयेची विकासकामे मंजूर : आ. मकरंद आबा पाटील



वाई प्रतिनीधी राहुल पिसाळ 

वाई मतदारसंघातील रस्ते, ग्रामपंचायत कार्यालय बांधणे, स्मशानभूमी शेड बांधणे व सुशोभिकरण, जिल्हा परिषद शाळा इमारत खोल्या बांधणी, साकव पूल बांधणे या विकासकामांसाठी १८ कोटी ३४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून हा निधी मंजूर झाला आहे.

वाई तालुक्यातील धोममधील कातकरी वस्तीच्या साकव पुलासाठी ६० लाख, यशवंतनगर ते बालाजीनगर साकवसाठी ५४ लाख, शिरगाव ते पिसाळवस्ती रस्त्यासाठी १५ लाख, मुगाव रस्त्यासाठी १५ लाख, पसरणीतील नेवसेवस्ती कॅनाल रस्त्यासाठी १५ लाख, कोरले ते ओहोळी रस्त्यासाठी १५ लाख, वयगांव ते दतमंदिर रस्त्यासाठी ४० लाख, उडतरे ते पोपटवस्ती रस्त्यासाठी २० लाख, व्याजवाडी ते मालुसरेवाडी (मधलीवस्ती) कॅनॉल रस्त्यासाठी २५ लाख, जांब शाळेच्या ४ वर्ग खोल्यांसाठी ६१ लाख, गुळुंब शाळेच्या ३ खोल्यांसाठी ४५.७५ लाख, अभेपुरी शाळेच्या ६ खोल्यांसाठी ९१.५० लाख, मांढरदेव शाळेच्या ५ खोल्यांसाठी ७६.२५ लाख, वाशिवली शाळेतील ४ खोल्यांसाठी ६१ लाख, कोंढवली शाळेतील ६ खोल्यांसाठी ९१.५० लाख, व्याजवाडी शाळेच्या वर्गखोल्यांसाठी ३०.५० लाख, रेणावळे शाळा खोल्यांसाठी ९१.५० लाख, गोळेवाडी शाळेच्या खोल्यांसाठी ३०.५० लाख, स्मशानभूमी शेड, प्रतिक्षालय व संरक्षक भिंतीसाठी भोगाव ७ लाख, विठ्ठलवाडी १० लाख, उडतरे १० लाख, लोहारे १० लाख, मापरवाडी ५ लाख, वाकणवाडी १० लाख, वडाचीवाडी १० लाख, एकसर ५ लाख, दह्याटसाठी ७ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. याचबरोबर ग्रामपंचायत कार्यालयासाठी बोपर्डीला १२ लाख, ग्रामपंचायत दुरुस्तीसाठी परतवडीसाठी ५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

   खंडाळा तालुक्यातील पिंपरे बु. केसरकरवस्ती येथे साकवसाठी ४७ लाख, असवली ते केसुर्डी रस्त्यासाठी ४५ लाख, विंग ते मोरजाईवस्ती रस्त्यासाठी ३५ लाख, जवळे गांव ते स्मशानभूमी रस्त्यासाठी ३५ लाख, सांगवी शाळा वर्ग खोल्यांसाठी ३०.५० लाख, कोपर्डे शाळेतील खोल्यांसाठी १ कोटी २२ लाख, वाघोशी शाळेतील खोलीसाठी १५.२५ लाख, धनगरवाडी शाळेतील खोल्यांसाठी ४५.७५ लाख, स्मशानभूमीच्या विविध कामांसाठी धावडवाडी १० लाख, खेड बुद्रक ८ लाख, शेडगेवाडी ८ लाख, कोपर्डे तरडेवस्ती ८ लाख, येळेवाडी (बोरी) ७ लाख, मिरजे १२ लाख, मोर्वे १० लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

   महाबळेश्वर तालुक्यातील सोनाट येथे साकवसाठी ६० लाख, उंबरी धावली रस्त्यासाठी २५ लाख, घावरी येणें रस्त्यासाठी २५ लाख, खांबील पोकळे रस्त्यासाठी २५ लाख, अवकाळी रस्त्यासाठी २५ लाख, तळदेव शाळेतील खोलीसाठी १५. २५ लाख, माचुतर शाळा खोलीसाठी १५.२५ लाख, दुधगांव शाळेतील खोल्यांसाठी ९१.५० लाख, हरोशी शाळेतील खोलीसाठी १५.२५, वाळणे शाळेतील खोल्यांसाठी ६१ लाख, खरोशी शाळेतील खोल्यांसाठी ४५.७५ लाख, स्मशानभूमी विविध विकासकामांसाठी गोरोशी ७ लाख, टेकवली ७ लाख, दानवली ७ लाख, गोगवे ५ लाख, वानवली तर्फ सोळशी ७ लाख, प्रतापगड ७ लाख, रेणोशी ७ लाख, येर्णेसाठी ७ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.