Ticker

6/recent/ticker-posts

आर्थिक साक्षरता आवश्यकता आहे-श्री.अमेय वझे

छायाचित्र - पुसेगाव _कला व वाणिज्य महाविद्यालयात  'आर्थिक साक्षरता ' या विषयावर मार्गदर्शन करताना श्री.अमेय वझे  व विदयार्थी, शिक्षक.


बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ]

 पैशाचा वर्तमान आणि भविष्यातील वापर आणि व्यवस्थापनाबाबत प्रभावी कृती करण्याची क्षमता प्रत्येक नागरिकांनी समजून घेणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन श्री. अमेय वझे यांनी केले. पुसेगाव येथील, कला व वाणिज्य महाविद्यालयात वाणिज्य विभाग आणि भारतीय ग्राहक मार्गदर्शक संस्था, मुंबई. यांच्या संयुक्त विद्यमाने 'आर्थिक साक्षरता 'आयोजित कार्यशाळेत ते प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीत महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर.पी. भोसले, प्रा.डॉ .संजय क्षीरसागर प्रा.ए.टी.खाडे , प्रा.एल.के. पवार , प्रा.डॉ एन.डी.लोखंडे प्रा. डॉ. जगताप इत्यादी उपस्थित होते. पुढे आपल्या भाषणात श्री. वझे म्हणाले,'  पैशाचा वापर आपण कशा पद्धतीने करू शकतो, व्यक्तीने पैशाचे  नियोजन भविष्याच्या दृष्टीने करणे किंवा पैसा कुठे ,कशासाठी खर्च करायला हवा .

या गोष्टीचे ज्ञान असणे म्हणजेच आर्थिक साक्षरता होय. या पैशाचा उपयोग दैनंदिन जीवनातील मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी माणसाला योग्य वेळी होत असतो.हे देखील समजून घेणे आवश्यक आहे .आर्थिक साक्षरतेमध्ये बचत, पगार ,गुंतवणूक, शिक्षण, विमा  हप्ता, व्याज, इत्यादी बाबतचे  योग्य व्यवस्थापन म्हणजे आर्थिक साक्षरता होय . आर्थिक मर्यादानुसार जमा, खर्चाची तोंड मिळवणी करण्याची ती एक कला आहे . त्यासाठी समाजातील स्त्री-पुरुषांनी, विद्यार्थ्यांनी आर्थिक व्यवस्थापन समजून घेणे आवश्यक आह. असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन.प्रा.एम.एस.वाघ  यांनी केले.कार्यक्रमाचे आभार  प्रा.डॉ.संजय क्षीरसागर यांनी मानले .या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर, सेवक विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.