Ticker

6/recent/ticker-posts

घाणीचे साम्राज्य ग्रामपंचायत देणार का लक्ष ?गावाला कचऱ्याच्या ढिगाऱ्यांनी वेढले..


प्रतिनिधी :- सचिन ठुले

ता.पुर्णा :- पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव बाळापुर येथे घाणिचे साम्राज्य.गावाला कचऱ्याच्या ढिगाऱ्या वेठले  ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरल्याने व लहान. बालकांचे वयोवृद्ध लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे व अंगणवाडी परिसरात मोठे मोठे कचऱ्याचे ढीग साचल्याने दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे त्यामुळे बालकांचे व कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे व बालकांना ज्ञानार्जन करणे देखील अवघड झाले आहे स्वच्छ भारत अभियानाचा फज्जा गावामध्ये बहुतांश रस्ते चांगले तर काही खराब अवस्थेत असल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगार दिसुन येत आहेत

 पण  प्रशासन कडून लाखो रुपयांचे ठेके गाव शहर स्वच्छ करण्यासाठी देण्यात येते पण पिंपळगाव ग्रामपंचायत चे कचऱ्याचे नियोजन नसल्याने  मुख्य रस्ताने देखील कचऱ्याचे ढीग साचल्याने तो कचरा  पावसामळे कुजला जात आहे तसेच पाईपलाईन खोदल्यामुळे नाल्या बुजल्या आहेत त्या मध्ये पाणी जमा होऊन डास मच्छर जास्त प्रमाणात होत आहेत गावात घाणिचे  दुर्गंधीचे साम्राज्य झाल्याने प्रत्येक घरातील व्यक्ती हिवताप चिकनगुनिया मलेरिया टायफाईड इत्यादी आजाराला बळी पडत आहेत याची दक्षता ग्रामपंचायत कार्यालयाने लवकरात लवकर घ्यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे.