Ticker

6/recent/ticker-posts

श्री बाळूमामा दिंडीचे आज प्रस्थान



तीर्थक्षेत्र बोबडेवाडी ते आदमापूर श्रावणी पायी दिंडी सोहळा जाणार


बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ]

बोबडेवाडी (विसापूर) ता.खटाव येथील श्री संत शिरोमणी बाळूमामा देवस्थानची मंगळवार दि १३ ऑगस्ट ते शुक्रवार २३ ऑगस्ट या कालावधीत श्रावणी पायी पालखी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले आहे. या दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची मुक्काम, अल्पोपहार, जेवण, आरोग्यसेवा तसेच औषध पाण्याची मोफत सोय केली आहे. या दिंडीत विसापूर पंचक्रोशी व  खटाव तालुक्यातील अधिकाधिक वारकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन, श्री बाळूमामा देवस्थान व्यवस्थापनाने केले आहे.श्री संत शिरोमणी बाळूमामा देवस्थानच्या पायी पालखी सोहळ्याचे यंदाचे ३ वे वर्ष आहे. मंगळवार दि.१३ ऑगस्टला सकाळी ८ वाजता तीर्थक्षेत्र बोबडेवाडी येथून आदमापूरच्या दिशेनं दिंडीचे प्रस्थान होईल. 

मंगळवार दि.१३ ऑगस्टला औंध,बुधवार दि.१४ ऑगस्टला शामगाव,  गुरुवार दि.१५ ऑगस्टला कापिल, शुक्रवार दि. १६ ऑगस्टला कामेरी, शनिवार दि.१७ ऑगस्टला घुणकी, रविवार  दि.१८ ऑगस्टला उचगाव, सोमवार दि.१९ ऑगस्टला पिंपळगाव खुर्द, मंगळवार दि.२० ऑगस्टला गुरंबे, बुधवार दि.२१ ऑगस्टला कुरणी, गुरुवार दि.२२ ऑगस्टला तीर्थक्षेत्र आदमापूर मुक्कामी पोहचेल. शुक्रवार दि. २३ ऑगस्टला सकाळी काल्याचे किर्तन, दीपोत्सव व सांगता कार्यक्रम होईल. 

दिंडी सोहळ्या दरम्यान ठीकठिकाणी भजन, कीर्तन, प्रवचन, भारुड, हरिपाठ, दैनंदिन आरतीचा कार्यक्रम होईल. श्री संत शिरोमणी बाळूमामा देवस्थान व्यवस्थापनाने दिंडीच्या जेवणाच्या व मुक्कामाच्या जागांची पाहणी करून उत्तमोत्तम नियोजन केले आहे. सर्व मुक्कामांच्या ठिकाणी निवाऱ्यासाठी अतिरिक्त तंबुंची सोय केली आहे. दिंडी सोहळ्याच्या यशस्वीतेसठी विसापूर व पंचक्रोशीतील ग्रामस्थ विशेष परिश्रम घेत आहेत.