Ticker

6/recent/ticker-posts

स्वाभिमानी विद्यार्थी परिषद संवाद यात्रा शुक्रवारी वडिगोद्रीत


स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे सौरभ राजु शेट्टी साधणार विद्यार्थ्यांशी संवाद..

बंडु शिंगटे  घुंगर्डे हादगाव 

मराठवाड्यातील विद्यार्थांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेची संवाद यात्रा ही सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे.ही संवाद यात्रा वडिगोद्री येथे शुक्रवार रोजी येणार आहे.विद्यार्थी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सौरभ राजु शेट्टी विद्यार्थ्यांशी सवांद साधणार आहेत.ते वडिगोद्री येथील सर्व शाळा व महाविद्यालयाना भेट देवून विद्यार्थ्यांशी संवाद सांगणार आहे.

    शाळा महाविद्यालय, विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी आणि त्यांचे प्रश्न शासन दरबारी उपस्थित करून त्यांची सोडवणूक करण्यासाठी स्वाभिमानी विद्यार्थी परिषद पाठपुरावा करणार आहे.

    जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनाी या संवाद यात्रेत सहभागी व्हावे असे आव्हान मराठवाडा अध्यक्ष गणेश पांडुरंग गावडे, स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे जिल्हाध्यक्ष विशाल ढेबे, जिल्हाउपाध्यक्ष सोपान उगले,युवा तालुका कार्यध्यक्ष गोपाल खोमणे, प्रदिप खोसे, सुनिल गायकवाड यांनी केले आहे.दरम्यान,या सवांद यात्रेची जय्यत तयारी झाली असल्याचे सांगितले.