Ticker

6/recent/ticker-posts

पथारी धारकांच्या प्रश्नावर चर्चा



 प्रतिनिधी खेड :

महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल संलग्न पथारी सुरक्षा दल आळंदी शहर महिला आघाडीच्या वतीने पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनात आणि आळंदी शहराच्या महिला आघाडी अध्यक्षाःसपना काळे यांच्या अध्यक्षतेखाली आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी मा.कैलास केंद्रे साहेब यांची भेट घेऊन भाजी मंडई,झाडी बाजार,आळंदी शहरातील पथारी धारकांच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली, मुख्याधिकारी साहेब यांनी तात्काळ आपल्या प्रश्नांवरती काम करण्यात येईल असे 

सांगत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्यानंतर,आळंदी शहराच्या महिला आघाडी उपाध्यक्षाःसीमा मिटकरी यांनी मुख्याधिकारी साहेबांचे आभार व्यक्त केले, शिष्टमंडळातील पदाधिकारी,पुणे जिल्हा अध्यक्षःसंतोष सोनवणे आळंदी शहर महिला आघाडी अध्यक्षाःसपना काळे,उपाध्यक्षाःसीमा मिटकरी,गायत्री बाफना, प्रियंका मुंजाळ,शितल कल्याणकर,कांचन थोरवे,सोनाली नारिंगे,चंपा गायकवाड,चिंतादेवी गुप्ता,चौधरी मॅडम,रुक्मिणी तिडके,वर्षा काकडे, राऊत मावशी तसेच सर्व महिला आघाडी उपस्थित होत्या.