Ticker

6/recent/ticker-posts

बदलापूर येथे घडलेल्या अत्याचाराच्या विरोधात निषेध करून आळंदी पोलीस स्टेशनला निवेदन

 


 महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दलसंलग्न पथारी सुरक्षा दल,संघर्ष नायक मा.भगवानराव वैराट साहेब यांच्या मार्गदर्शनात आळंदी शहर महिला आघाडीच्या वतीने, पुणे जिल्हा महिला आघाडी कार्याध्यक्षा निलम सोनवणे, आळंदी शहर महिला  आघाडी अध्यक्षा सपना काळे, आळंदी शहर महिला आघाडी उपाध्यक्षा सीमा मिटकरी यांच्या नेतृत्वात  बदलापूर येथील लहान मुलीवर बलात्कार करून अत्याचार करणाऱ्या नराधमास फास्टट्रॅक वर घेऊन फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन आळंदी पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून चर्चा करून  देण्यात आले, निवेदनातील प्रमुख मागण्या संबंधित नराधमास फास्टट्रॅक वर घेऊन फाशीची शिक्षा देण्यात यावी, आळंदी शहर हे जगातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असल्यामुळे आळंदी शहरात विद्यालय, शाळा असून शाळेचे मुख्याध्यापक, व्यवस्थापक यांची पोलीस स्टेशन येथे बैठक घेऊन सतर्कतेच्या सूचना कराव्यात,शाळेमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात यावे, महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी,

सीसीटीव्ही 3 ते 4 दिवसाला तपासणी करण्यात यावी,या सर्व मागण्या करत निवेदन देण्यात आले, निवेदन देण्यासाठी उपस्थित कांचन थोरवे,प्रियंका मुंजाळ,शितल कल्याणकर,अश्वीनी तगडपल्लेवार, रुक्मिणी तिडके,स्वाती शिंदे, सारिका दौंडकर वर्षा काकडे,मंगल कोळी,अनिता उडापे,गायत्री मुंडे, स्वरूपा तिडके,मिरा लबडे,वर्षा रायबोले,रेखा भिसे,कल्पना पोलादे,संगीता मेटे,तारामती कांदे,गवळणी पांचाळ,कमल खरात,कविता नामपल्ली,रेणुकभारती,सुनिता काळे,अनुसया धनगर,सरस्वती घोंगडे,संतोष सोनवणे,बाळासाहेब जाधव,सचिन काळे, मोहंम्मद हकीम,गणेश मुंजाळ,निलेश ढोकणे,भय्या चौधरी,शंकर गुंजाळ,मेहबूब शेख,शंकर गुंजाळ,चेतन गड्रेल,करण केकान, इम्तियाज शेख,जयेश गांधी,नवनाथ तिडके होते. निवेदन आणि प्रास्ताविक पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष सोनवणे यांनी केले.