Ticker

6/recent/ticker-posts

रस्त्यावरून पाणी जात असल्यामुळे तब्बल चार तास वहातुक ठप्प ...



प्रतिनिधी :- सचिन ठुले

पुर्णा तालुक्यातील पुर्णा ते झिरो फाटा पुर्णा रोडवरील माटेगाव येथील थुना नदीवरील.पुलाचे काम मागील अनेक महिन्यातीपासुन सुरु आहे.जुणा पुल पाडल्यामुळे या पुलाच्या बाजुने कंत्राटदाराने पर्यायी रस्ता अरुंदी चार फुटी सिमेंट च्या नळ्या टाकून कमी उंची चा जामीनी लगत रस्ता आहे या मुळे मागील उन्हाळ्यात या ठिकाणी दोनदा अपघात घडले आहेत परंतु पावसाळ्यात मात्र या प्रर्यायी अरुंद रस्त्यावरून अनेकदा पाणी जात आहे त्या तच काल दि- 2 ऑगस्ट रोजी पडलेल्या पावसामुळे नदीला पुर आला यामुळे वहातुक ठप्प झाली होती यावेळी त्या पाण्यातून शेतकरी महिला प्रवासी पलीकडे जाण्यासा प्रयत्न करीत होते या मुळे कधी जीवित हानी होईल याची शक्यता नाकारता येत नाही परिणामी प्रर्यायी रस्ता धोकादायक बनवला आहे या वरून वहानधारकांना जाणे येणे करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे वळन रस्त्यावरून रात्रीच्या वेळी पथदिवे रेडियम दिशादर्शक. बोर्ड लावालेले.नाहीत या मुळे या ठिकाणी वारंवार अपघात घडत आहेत.

सदरील कंत्राटदाराने या रस्त्याची उंची व रुंदी वाढवून रस्ता मजबूत करावा अशी मागणी शेतकरी व प्रवासी वर्ग व्यक्त करत आहे..