Ticker

6/recent/ticker-posts

पांढरवाडीनजीक बैलांची विनापरवाना वाहतूक



छळप्रकरणी पुसेगाव पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल


बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]  

पांढरवाडी हद्दीतील वाठार ते पुसेगाव रस्त्यावर विनापरवाना दोन बैलांची वाहतूक केल्याप्रकरणी पुसेगाव पोलिस ठाण्यात दोघाविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम - कलम १९६० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय मुरलीधर शिंदे (रा. आहिरे, ता. खंडाळा) व वैभव धनाजी धायगुडे (रा. पाडळी, ता. खंडाळा) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. अशी माहिती पुसेगावचे सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे यांनी दिली.

डिस्कळ येथील रोहन जोतिराम कदम यांनी फिर्याद दाखल केली होती. शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास पांढरवाडी पोस्ट डिस्कळ हद्दीतील वाठार ते पुसेगाव रोडवर चारचाकी (एमएच ११ सीएच ९४९७) मधून विनापरवाना दोन देशी बैल नेले जात होते. बैलांना क्रूरपणे वागणूक देऊन चारा पाण्याची व्यवस्था न करता घेऊन जात असल्याने फिर्यादी कदम यांनी विजय मुरलीधर शिंदे व वैभव धनाजी धायगुडे यांचेविरुद्ध प्राण्याचा छळ प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११, ११ (१) (डी) भारतीय न्याय दंड संहिता कलम ३ (५) प्रमाणे कायदेशीर तक्रार केली आहे. पोलिस नाईक कदम तपास करत आहेत.