बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
श्री नागनाथ माध्य वं उच्च माध्यमिक विद्यामंदिर बुधची श्रावणी सहल राजापूर महादेवदरा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती . विद्यालयाचे प्राचार्य अंकुश भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहल विभाग प्रमूख भगवान सरवदे यांनी सहलीचे नियोजन केले . त्याप्रमाणे विद्यालयाचे सर्व विद्यार्थी यांनी राजापूर येथील जानुबाईदेवी चे दर्शन घेतले यावेळी राजेंद्र घाटगे यानी जानुबाईदेवी महत्त्व व ऐतिहासिक पार्शभूमी सांगीतली . त्यानंतर सर्वोदय सामाजिक संस्था बुध काटेवाडी यांच्या मालकीची असलेली महादेवदरा या ठिकाणी जागेतील वृक्षारोपन केलेल्या नैसर्गिक ठिकाणी भेट दिली . यावेळी सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी एकत्रित वनभोजनाचा आनंद घेतला . यावेळी 10 वी मधील विद्यार्थी गणेश माने याचा मोठ्या उत्साहात वाढदिवस निसार्गाच्या सानिध्यात साजरा केला .
प्रा दत्तात्रय काळुखे सर सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन करून सुत्रसंचलन केले . माध्य व उच्च माध्यामिक विद्यार्थिनी व विद्यार्थी यानी सांस्कृतिक कार्यक्रम बहारदार सादर केला . पावसाच्या रिमझीमीमध्ये विद्यार्थ्यांनी सुरतालत नृत्य केले . तसेच विद्यार्थी यानी डोंगर ट्रेकिंग देखील केले . यावेळी विद्यालयाच्या वतीने सर्व विद्यार्थी याना छान शिरा व मसालेभात दिला . यावेळी पर्यावरणाच्या सानिध्यात व निसर्गाला साक्ष ठेऊन विद्यालयातील सर्व विद्यार्थीनिनी विद्यार्थ्यांना राख्या बांधुन रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा केला . पर्यावरणातील या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे महत्तव जीवन ( काका )इंगळे पर्यावरणाचे व मानवाचे कसे अतूट नाते याबद्दल आपले मत मांडले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहशिक्षिका सविता भांगरे , प्राजक्ता इंगळे , प्रा .संध्या बोराटे, प्रा .मोनाली खोत तसेच शिक्षक नाना दडस, तानाजी पाटील, संजय माने, नितीन नारागुडे , नवनाथ काळे ,नवनाथ दळवी, प्रा विशाल नाळे यांचेही सहकार्य मिळाले . तसेच गोंविद बोराटे व विकास कांबळे महादेव खोमणे यानी जेवणाची व पाण्याची व्यवस्था केली पोषण आहाराच्या भाभी चे सहकार्य मिळाले . विकास कांबळे व प्रा दत्तात्रय काळुखे यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला व सहल यशस्वीपणे संपन्न झाली





Social Plugin