बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ जयंतीनिमित्त वडुज येथील शासकीय विश्रामगृहात विविध सामाजिक धार्मिक चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना समाजसेवक पुरस्कार सोहळा संपन्न झाला .वंचित बहुजन आघाडी चे खटाव तालुका नेते गणेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली
शासकीय विश्रामगृहात विविध सामाजिक धार्मिक राजकीय विषयांवर चर्चा करण्यात आली. खेडोपाडी गावातील कार्यकर्ते यांचा सत्कार करुन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजसेवक पुरस्कार वितरण करण्यात आले. येणाऱ्या काळात प्रत्येक कार्यकर्ताला सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. प्रत्येक कार्यकर्ताला ताकद दिली जाईल. समाजातील गोरगरीब लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पँथर ग्रुप चे अध्यक्ष भगवान मोरे यांनी सांगितले.
यावेळी प्रमुख उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे नेते गणेश भोसले यांनी शोषित पिडीत वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. प्रत्येक कार्यकर्ताला सन्मानाची वागणूक दिली जाईल. अन्याय अत्याचार विरोधात सर्वांनी एकत्र मिळून लढले पाहिजे. फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारेवर चालेले पाहिजे. असं गणेश भोसले यांनी सांगितले. यावेळी आर. पि आय. महिला नेत्या गौतमी मसणे यांनी महिलांना मान सन्मानाची वागणूक मिळावी तसेच महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढले असून महिलांना एकत्र मिळून लढले पाहिजे असे सांगितले.
यावेळी विविध समाजातील कार्यकर्ते यांचा समाजसेवक पुरस्कार वितरण करण्यात आले. आंबेडकर चळवळीतील जेष्ठ नेते अशोक बैले, ॲड. शुभम नलवडे, भारतीय बौद्ध महासभा ता. अध्यक्ष बी.आर. जगताप, जेष्ठ नेते बापूराव वाघमारे, विठ्ठल नलवडे, सुनील मिसाळ, महेंद्र खिलारे, अमिन आगा, पत्रकार ओंकार इंगळे, कुलदीप इंगळे, संदेश वाघमारे, बाळासाहेब निकाळजे, संदिप काळे, सचिन शिंदे, गणेश तोरणे, संतोष बरकडे, अभिजित बोकडे, गणेश यादव, जितू सोनवले, प्रकाश बनसोडे, अजित पाटेकर, वसंत मिसाळ, गणेश निकम, अक्षय घाडगे, शंकर भोसले, अजित भोसले, गणेश सोनवले, प्रकाश कदम, प्रशांत गुजर, संपत जगताप, महिला मध्ये मनिषा जाधव,सलमा बैगम, शोभा निकाळजे, शालन बुधे, शरद शिंगाडे, भागवत जगताप , भिमा सावंत, मनोज खिलारे, दादा बनसोडे इ. उपस्थित होते.





Social Plugin