Ticker

6/recent/ticker-posts

दशक्रिया करून सरकारचा जाहीर निषेध...



आदिवासी कोळी महादेव समाज आज करणार मुंडन अन्नत्याग उपोषणाचा आज दहावा दिवस

प्रतिनीधि रविंद्र गव्हाळे मलकापुर

मलकापुर :-  गेल्या दहा दिवसापासून आपल्या विविध मागण्यासाठी आदिवासी कोळी महादेव समाजातील नागरिक उपविभागीय अधिकारी कार्यालय मलकापूर यांच्या कार्यालयासमोर अन्नत्याग उपोषण करत आहे. शासनाकडून प्रमाणपत्र वितरित करण्यात आलेलं नाही त्याच निश्चतार्थ आज शासन व प्रशासनाच्या जाहीर निषेध करत समाज बांधव एक वाजता मुंडन करणार आहेत ही शासन व प्रशासनासाठी खूप लाजिरवाणी बाब आहे. कोळी महादेव समाजातील नागरिकांच्या मागण्या पुढील प्रमाणे आहेत. 

 ज्या आदिवासी कोळी समाज बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र मिळाले आहे, त्यांच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तीना कोणतेही कागदपत्रं न मागता जात वैधता प्रमाणपत्र मिळावे. जात पडताळणी समितीच्या वतीने सुरू असलेली तपासणी तात्काळ थांबवावी.शालेय विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी वैधताबाबत काढलेले शासन परिपत्रक रद्द करण्यात यावे.तालुका स्तरावर उपविभागीय अधिकारी यानी निर्गम उतारा व पालकांची जात प्रमाणपत्र या पुराव्यावरून जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे.