बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
सातारा जिल्हा गुरव संघटना व खटाव तालुका गुरव समाज संघटना यांची विद्यमाने जायगाव (औंध )तालुका -खटाव जिल्हा -सातारा येथे श्रावणी व जानवी सोहळा सोमवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमेच्या पवित्र दिवशी आयोजित करण्यात आला आहे. दरवर्षी हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत असतो .
गुरव समाजात श्रावणी व जानवी सोहळ्याचे विशेष महत्त्व आहे .यानिमित्ताने पारंपारिक शिवभक्त व श्री महादेवाचे पुजारी असणारा गुरव समाज मुंज विधीचा कार्यक्रम आयोजित करत असतो तसेच गुरव समाजातील थोर संत काशीबा गुरव महाराज यांचे स्मरण यावेळी केले जाते . या वेळी शिवपूजा, शिव दीक्षा, गृहमक व जानवी घेणे असे धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न होत असतात . इयत्ता १०वी, १२ वी तसेच अन्य तत्सम परीक्षेत यश मिळवणाऱ्या विदयार्थ्यांचा व समाजातील उल्लेखनीय काम केलेल्या मान्यवरांचा "गुरव समाज भूषण " पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो .सदर पुरस्कार गुरव समाजातील अभ्यासू व्यक्तिमत्व स्वर्गीय मधुकर गुरव पुसेसावळी माजी सैनिक यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव महेश मधुकर गुरव हे देत असतात.
. यावर्षी गुरव समाज भूषण पुरस्काराचे मानकरी परमपूज्य श्री दादा महाराज गुरव गोरेगाव, श्री प्रमोद वाघ ,श्री देविदास गुरव बारामती ,श्री रवींद्रकुमार गुरव खटाव ,प्रा संगीता गुरव सैनिक स्कूल सातारा,श्री अनिल उपाध्ये गोपूज, श्री सुभाष गुरव सातारा, श्री हरिदास गुरव मुंबई , कु. मेघल गुरव जाखणगाव, श्री तात्यासाहेब गुरव जायगाव, श्री दत्तात्रय गुरव जायगाव, तसेच संगित शिक्षक विकास गुरव गोरेगाव यांना जाहीर झाला असून प्रमुख अतिथीच्या शुभहस्ते या मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे .
तरी समस्त गुरव बांधवांना आवाहन करण्यात येते की ज्या बटूंच्या मुंजी करायच्या असतील त्यांनी आपली नावे कमिटीकडे नोंद करावीत तसेच मोठ्या संख्येने समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन समस्त जायगावकर गुरव समाज, तालुका सचिव श्री विजय गुरव सर , जिल्हा प्रतिनिधी श्री सुभाष गुरव गुरुजी, तालुकाध्यक्ष श्री राजेंद्र गुरव , उपाध्यक्ष श्री राजेंद्र गुरव गोपूजकर,सौ शितल गुरव पुसेसावळी , मनीषा गुरव वडूज व श्री मोहनराव गुरव सर पुसेगाव यांनी केले आहे.





Social Plugin