Ticker

6/recent/ticker-posts

श्री सेवागिरी विद्यालयात वृक्षा बंधन उत्साहात साजरा



बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ] 

श्री सेवागिरी विद्यालय पुसेगाव या ठिकाणी सांस्कृतिक गुरुकुल विभागातील कला महोत्सव अंतर्गत वृक्षा बंधन साजरा करण्यात आला. कलाशिक्षिका सौ. फाळके एस. डी. यांच्या मार्गदर्शना खाली  सांस्कृतिक कला महोत्सव अंतर्गत मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा .  विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा.  या दृष्टिकोनातून शाळेमध्ये झाडांना राखी बांधून  विद्यार्थी सहभागी झाले होते.

प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीची रक्षा करण्याकरिता सदैव कटीबद्ध असतो. त्याचप्रमाणे झाडाला राखी बांधून त्याची रक्षा व संगोपन करण्याची शपथ यावेळी  घेण्यात आली. यासाठी मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, स्थानिक स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती, गुरुकुल विभाग, माता पालक संघ  शिक्षक पालक संघ व शाळेतील सर्व शिक्षक व सेवक वर्ग यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. शाळेत नेहमी च सांस्कृतिक, सहशालेय  उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सार्वांगीण विकास साधला जातो.