Ticker

6/recent/ticker-posts

जिद्द चिकाटीच्या जोरावर विजय बनला पीएसआय

  


पहिल्या प्रयत्नात मिळाले यश. मित्र परिवाराकडून जल्लोष. 

प्रतिनिधी: सागर चव्हाण                                     

नेर ता. 4: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकताच पोलीस उपनिरीक्षक 2022 परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत नेर येथील विजय जगदीश जाधव याने यश मिळवले आहे जिद्द चिकाटीच्या जोरावर त्यांनी यशाला गवसणी घातली आहे दरम्यान त्यांच्या यशाच्या आनंद व्यक्त करताना मित्र परिवाराकडून गुलालाची उधळण करत जल्लोष करण्यात आला. 

शेतकरी कुटुंबांची पार्श्वभूमी असलेल्या विजय जाधव गेल्या चार-पाच वर्षापासून  पुणे येथे एमपीसी यूपीसी चा अभ्यास करत होता व आपल्या वडिलांची मेहनत बघून तो जोराने अभ्यासाला लागला होता आणि विजयने शेवटी वडिलांचे स्वप्न पूर्ण केले व विजय पीएसआय झाला. जिद्द व चिकाटी असल्यास कुठल्याही परीक्षेला सामोरे जाणे अवघड नाही कुटुंबाचे प्रेम व पाठिंबा जवळच्या मित्रांची साथ यामुळे प्रवास शक्य झाला.