प्रतिनिधि जिशान सय्यद
मंगरूळ : जळकोट तालुक्यातील मंगरूळ गावातील ग्रामपंचायत कार्यालयात अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.अण्णाभाऊ साठे यांनी फकीरा हा ग्रंथ लिहीला .अनेक साहित्य रचना केली, व त्यांची देशासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान आहे तसेच लोकमान्य टिळक यांनी आपल्या लिखाणातून भुमिका बजावली आहे.सुरवातीस
टिळकांनी वृत्तपत्र सुरू केले, त्यांच्या इंग्रजा विरोधात नारा दिला होता."स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ते मिळणारच "हा होता त्यांनी अनेक सार्वजनिक उत्सव सुरू केले.त्यानिमित्त शाळकरी मुलांची स्पर्धा घेण्यात आली. व त्यांना पुस्तके वाटप करण्यात आली.मंगरूळ
ग्रामपंचायत कार्यालयाचे सदस्य बाबा पटेल.,हकीम पटेल व सामाजिक कार्यकर्त सुनिल भालेराव, मनसे नेते शुभम चंदनशिवे व सुभाष हुंडेकर युवा नेतृत्व सलमान पठाण व गावातील नागरिक, विद्यार्थी, युवक व पोलीस कर्मचारी या कार्यक्रमात उपस्थित होते.





Social Plugin