बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
विद्यालयाचे प्राचार्य श्री अंकुश भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदी विषयाचे विभाग प्रमुख संजय माने यांनी हिंदी दिवस मोठ्या उत्साहात श्री नागनाथ विद्यामंदिर बुध मध्ये साजरा केला . आपल्या प्रास्तावनेमध्या संजय माने सर यांनी हिंदी दिवसाचे महत्तव हिंदी दिवस साजरा करण्याचा उद्देश स्पष्ट केला . तसेच हिंदी विषयाच्या सहशिक्षीका सविता भांगरे मॅडम यानी देखील हिंदी दिनाविषयी आपले मनोगत व्यक्त केले . विद्यालयातील विद्यार्थिनी कु . तन्वी विकास पात्रेकर व कु .मुस्कान मुनाफ मोमीन यांनी देखील हिंदी दिनाविषयी मनोगते व्यक्त केली . विद्यालयाचे प्राचार्य व शिक्षक यांच्या हस्ते हिंदी बाह्य परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक व गुलाब पुष्प देऊन सत्कार व अभिनंदन करण्यात आले .
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य अंकुश भांगरे यांनी हिंदी भाषाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून देशातील विविध राज्यांमध्ये संवाद साधण्यासाठी हिंदी भाषाचा वापर केला जातो . तसेच नियमितपणे हिंदी बोलण्याचा प्रयत्न केला पाहीजे असे मत मांडले . सहशिक्षीका प्राजक्ता इंगळे यांनी देखील हिंदी काव्य गायनं केले . तसेच सहशिक्षक भगवान सरवदे यांनी मंथन बाह्यस्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थी यांचा सत्कार प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्याचे वाचन केले . संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचलन इ 9वी मधील विद्यार्थिनी कु . आस्मिता चंद्रकांत चव्हाण व कु श्रेया वैभव लोहार यांनी केले व आभार संजय माने सर यानी मानले यावेळी हिंदी विभागाच्या वतीने सर्व प्राध्यापक ,शिक्षक शिक्षीका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला .





Social Plugin