बुध दि [ प्रकाश राजेघाटगे ]
विसापूर .येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस पांढरवाडी, विसापूर (ता.खटाव) येथील व्यावसायिक सुजित तानाजी कदम यांनी २५ हजार रुपयांची देणगी सुपूर्द केली. सुजित कदम हे प्रगतशील शेतकरी व प्रसिद्ध आले व्यावसायिक आहेत. येथील शिक्षक अतिशय कष्ट घेऊन विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देत आहेत. परिणामी येथील विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षेत यश मिळवत आहेत. शाळेच्या विविध भौतिक गरजा पूर्ण व्हाव्यात आणि मुलांना त्याचा उपयोग व्हावा यासाठी देणगी दिल्याचे श्री. सुजित कदम यांनी म्हटले आहे.
यावेळी केंद्रप्रमुख श्री.बापूराव कुचेकर यांनी कदम कुटुंबियांचे शिक्षण विभागाच्या वतीने आभार व्यक्त करत विसापूर ग्रामस्थांचे अभिनंदन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी येथील पालक, ग्रामस्थ आणि शिक्षक प्रयत्नशील असल्याचे पाहून कुचेकर यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी मुख्याध्यापक सौ.लतिका कर्पे, शिक्षक वैशाली नांदे, स्मिता शेळके, शुभांगी चव्हाण, वैशाली जाधव, ज्ञानेश्वर धायगुडे, रेश्मा बोडरे आदी उपस्थित होते.





Social Plugin