Ticker

6/recent/ticker-posts

मनोज जरांगे पाटील याची प्रकृती खालावली, तब्येतीबाबत डॉक्टरांकडून मोठी माहिती समोर


अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ

      मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळाव आपल्या या मागणीसाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत.आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा चौथा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. डॉक्टरांच्या पथकाने त्यांची काल दिवसभरात तीन वेळा तपासणी केली, मात्र त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे.काल जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या पथकाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांची तपासणी केली. तसेच उपचार घेण्याची विनंती केली,मात्र मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास नकार दिला.      दरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी जयश्री भुसारे यांनी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं म्हटलं आहे.

   मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारला.त्यांच्या आंदोलनानंतर सरकारनं मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली, मात्र अजूनही मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळाव आपल्या या मागणीवर मनोज दादा जरांगे पाटील ठाम आहेत. त्यासाठी ते पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. हे त्यांचं सहावं उपोषण आहे.आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस असून त्यांची प्रकृती खुप खालावली आहे.