कैलास कोल्हे @ग्रामीण प्रतिनिधी
मंठा: मातंग सेवा संघ या सामाजिक संघटनेच्या मंठा शहर अध्यक्ष ( युवक आघाडी ) पदी मातंग समाजातील सामाजिक कार्यकर्ते मा. कृष्णा उत्तमराव कांबळे ( जिंतूर रोड, मंठा ता. मंठा जिल्हा जालना ) यांची निवड करण्यात आली आहे. हि निवड मातंग सेवा संघ संस्थापक अध्यक्ष.मा. दिलीप मोहिते यांनी केली आहे. सदरची निवड मातंग सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मा. दिलीप मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली, जालना महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष मा. सविता पारखे यांनी केली आहे.
मंठा तालुक्यात मातंग समाज हिताचे काम काम त्यांनी करावे हि अपेक्षा समाज व्यक्त केली जात आहे. या निवडी बद्दल वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.





Social Plugin