Ticker

6/recent/ticker-posts

शिक्षक दिनी विद्यार्थीनी बनली मुख्याध्यापिका



तालुका प्रतिनिधी: शंकर निंबारे


मुरंबी | त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रम शाळा मुरंबी येथे (दि.५) रोजी मोठ्या उत्साहात शिक्षक दिन साजरा झाला. मूलींचा मोठा प्रमाणात प्रतिसाद लाभला.

  शिक्षक दिनाचे औचित्य साधुन इयत्ता १० वी मध्ये शिकणारी विद्यार्थीनी कु. मनिषा रामु गरेल हिने मुख्याध्यापिका म्हणून जबाबदारी सांभाळली तर कु. धनश्री भोये या विद्यार्थीनीने अधिक्षिका म्हणून जबाबदारी सांभाळली. शिक्षक दिनाची सुरवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पुजनाने करण्यात आली. शिक्षक दिन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पार पाडलेली जबाबदारी तसेच शिक्षणाविषयी आलेले अनुभवाबद्दल मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला उपस्थित सर्व शिक्षक यांचा पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री अथिलकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक दिन कार्यक्रमाचे अध्यक्ष कु मनिषा गरेल, प्रमुख पाहुणे कु. धनश्री भोये, अधीक्षक कु. विजय गभाले या विद्यार्थ्यांनी कामकाज पाहिले. तसेच शिक्षक म्हणून कु. कावेरी राऊतमाळे, कु. रत्ना पाडवी, कु. रुपाली राथड, कु. तुळसा रंधे, कु. सुर्वणा राऊत, कु. राजश्री निंबारे, कु. संपिता राऊत, कु. अजय राउत, कु. रोशन नावळे, कु. ओमकार राथड, कु. अजय राऊत या विद्यार्थीनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. तर शिपाई म्हणून राहुल पवार, या विद्यार्थी यांनी कामकाज पाहिले. 

  शिक्षक दिन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक श्री दशरथ माणिकराव  वडाळ सर, माध्यमिक शिक्षक श्री  प्रदिप शिंदे सर, श्री सुमेध खिलारे सर, श्री प्रभाकर शिंदे सर, अधिक्षिका श्रीमती विद्या पाहुणे, अधिक्षक छबीदास सहारे,  प्राथमिक शिक्षक सुहास अस्वले, दैलत  लहारे, श्रीम. रेखा महाले. श्रीम. हेमलता मोरे,  हेमंत चौधरी, माऊली बाजकर, तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रम सुत्रसंचालन प्रदिप शिंदे यांनी केले. आभार प्रदर्शन अस्वले सर यांनी केले. नंतर राष्ट्र गित घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.