Ticker

6/recent/ticker-posts

शिरपूर (जैन) मध्ये ईद मिलाद उन नबी मिरवणूक उत्साहात साजरी



मोहसीन खान(@)ग्रामीण प्रतिनिधी 

१६ सप्टेंबर २०२४ शिरपूर:- वाशिम जिल्ह्यात शिरपूर मध्ये ईद ए मिलाद जुलूस निमित्त मिरवणूक कळण्यात आली विशेष म्हणजे इस्लाम धर्मात पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिवसाला मोठं महत्व आहे. पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्मदिन ‘ईद मिलाद उन-नबी’ (Eid-E-Milad) म्हणून साजरा करण्यात येतो. ईद मिलाद उन-नबीच्या दिवशी घरं आणि धार्मिक ठिकाणं आकर्षक रोषणाईने सजवले जातात, प्रार्थना केली जाते. ठिकठिकाणी मिरवणुका काढल्या जातात. या दिवशी हजरत मोहम्मद यांच्या पवित्र वचनांचं, कुराणाचं पठण केलं जातं. 

इस्लाम धर्मात दान करण्याला मोठं महत्व आहे. ईद-ए-मिलाद-उन-नबी च्या निमित्ताने आजच्या दिवशी गरिबांमध्ये अन्नदान केलं जातं.ईद मिलाद उन नबीच्या दिवशी प्रार्थना आणि संदेश वाचण्याबरोबरच गरीबांना देणगी देखील दिली जाते. त्यांना जेवण दिले जाते.