Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामसेवक यांची बदली करणे बाबत.



प्रतिनिधी.बाळासाहेब खामकर.माजलगांव ग्रामीण 

 ग्रामपंचायत कार्यालयात कार्यरत असलेले ग्रामसेवक श्री.वाघमारे हे या गावात येत नाहीत मोबाईल वर संपर्क केला तर मोबाईल बंद असतो या कारणाने गावातील नागरिकांचे हाल होऊन त्यांची कामे होण्यास अडचण होत आहे एखाद्या वेळेस ग्रामसेवक हे भेटलेच तर अरेवारीची भाषा वापरतात व सांगतात की तुम्हाला मी बांधलेला गडी दिसत आहे का ?मला दुसरे काम नसतात का?

असे म्हणुन नागरिकांची हेळसांड करतात व खालच्या दर्जाची वागणूक देतात. तरी आपणास विनंती आहे की फुले पिंपळगाव येथे कार्यरत असलेले ग्रामसेवक श्री वाघमारे यांच्या योग्य ती कारवाई करावी व या गावाला नविन दुसरा चांगला कार्यक्षम ग्रामसेवक द्यावा ही विनंती.