स्वातंत्र्य दिनानिमित्त होणाऱ्या ग्रामसभेमध्ये निवडणूक या लोकशाही प्रक्रिये द्वारे चिंतामण तिबुडे यांना बहुमताने नवेगाव बु. येथीलग्रामस्थांनी तंटा मुक्ती समिती अध्यक्ष पदी निवडून दिले. चिंतामण तिबूडे यांनी या अगोदर सुद्धा गावातील तंटामुक्ती समितीचे 15 वर्षे अध्यक्ष म्हणून कार्य केले. यावेळी गावातील सरपंच तृप्ती अमित तिबुडे, उपसरपंच अंकुश चकोले, ग्रामपंचायत सदस्य जयकिसन शेंडे मंगेश पुराम, पूजा चकोले ,प्रतिभा बांते, सुषमा मेश्राम, काजल वाघाडे, ग्रामसेवक डि.जी. कावळे,श्रीराम शेंडे, वामन चकोले, विजय बांते, जसवंत तिबुडे, मोहन कोडवते,योगेश्वर शेंडे,मारुती चकोले, चुनीलाल बावनकर, रामेश्वर तिबुडे, बापू बांते, ताराचंद शेंडे,अक्षय पुडके, संदीप चकोले, विष्णुदास तिबुडे, महादेव मोहतूरे, मिताराम तिबुडे, कार्तिक चकोले , परमेश्वर तिबुडे, संदीप भेलावे, दिवान टेकाम, शंकर चकोले, योगेश्वर पटले, श्रीकृष्ण शेंडे, भाऊदास चमलाटे व मोठ्या संख्येने गावकरी यांनी सहभाग घेतला. या संपूर्ण प्रक्रिया शांततेने पार पाडल्याबद्दल संपूर्ण ग्रामवासी यांचे सरपंच तृप्ती तिबुडे यांनी आभार मानले व समाजात किंवा गावात झालेल्या तंट्याचे निष्पक्ष न्याय मिळवून देण्याचे कार्य करावे तसेच गावातील तंटे गावातच मिटवण्यासाठी प्रयत्न करावे अशी आशा व्यक्त केली





Social Plugin