Ticker

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री साहेब लाडकी बहीण योजनेचे पैसे तर दिले पण ऑपरेटरला फॉर्म भरण्याचा मोबदला कधी मिळणार



प्रतिनिधी - संदिप कटरे

 दि.1 सप्टें.2024 गाव- पानगाव - मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारने काडलेली योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्राम पंचायत ऑपरेटरने जीवाचे रान करून लाडकी बहिणीचे फॉर्म भर रात्री पहाटे भरून दिले तरी शासनाने त्यांना त्यांचा मोबदला अजुन पर्यंत दिला नाही. म्हणून आज सर्व ऑपरेटर एकत्रित येऊन एकच प्रश्न विचारत आहेत की ज्या लाडकी बहीणचे फॉर्म भरण्याकरिता आम्ही  सर्वसवी मदत करून सुद्धा आमचा मोबदला आम्हाला मिळालेला नाही तो तत्काळ आमच्या खाते मागवून टाकण्यात यावा अन्यथा ज्याही शासनाच्या योजना येणार त्यावर आम्ही बहिष्कार करणार असा इशारा आज संपूर्ण ऑपरेटर संघांनी दिला आहे. आज सर्व योजना आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दिवस रात्र एक तरी शासन मात्र आमचा विचार करत नाही जर असच राहील तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या सरकारला धडा शिकवावा लागेल असा इशारा आज सर्व ऑपरेटर संघांनी दिला आहे.