प्रतिनिधी संजय भरदुक मंपीर
इंझोरी येथील शेतकरी आज पोळ्याच्या खांदमळणीच्या दिवसा पोळ्याच्या अगोदरल्या दिवसाच्या कारणाने आज इंझोरीतील पती-पत्नी राहुल नानाजी ढोक अरुणा राहुल ढोक हे आज जामणी शेत शिवारातून आपल्या घरी परत असतानाजोरदार पाऊस चालू असताना नाल्याला पूर आला व त्या पुरा मधून गाडी काढत असताना त्यांच्या गाडीसहित पती-पत्नी दोघेही बैलगाडी वाहून गेले जवळपास बैल् गाडी 200 मीटर पर्यंत पलट्या मारत गेली या झटापटीमध्ये त्यांनी त्यांनी साडीचा पदर पकडून पाण्यामधून पोहोत् पोहोत बाहेर काढले त्याच क्षणांमध्ये एक बैलाला सुद्धा त्यांनी बाहेर काढले हा थरार त्यांच्या डोळ्यासमोर घडला आणि त्यामध्ये एक बैल वाचवण्यात त्यांना अपयश आले व बैल आणि गाडी हे दोघेही वाहून गेले त्यामध्येएक बैल त्यांचा मृत पावला
सदर घटनेची माहिती त्यांनी गावामध्ये येऊन सांगितल्यानंतर सास कंट्रोल रूमचे अजय ढोक व गावातील काही युवकव गावातील तीन ट्रॅक्टर घेऊन त्या घटनास्थळावर गेले व त्या घटनास्थळावरून त्यांचा मृत बैलत्यांची बैलगाडी हे पाण्याच्या प्रवाहातून बाहेर काढण्यात आली पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतरयामध्ये मदतीकरिता मंगेश पवार प्रकाश घोडे बंडू ढोक प्रमोद ढोक गजानन भाऊ रोशन राठोड सागर ढोक आकाश ढाकुलकार या सर्वांनी मिळून घटनास्थळी मदत करून मृत बैल व त्यांची बैलगाडी बाहेर काढण्यात आली





Social Plugin