Ticker

6/recent/ticker-posts

करंजाळा परीसरात वीज पडून बैल दगावला



बंडु शिंगटे घुंगर्डे हादगाव 

    अंबड तालुक्यातील वडीगोद्री परीसरात वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. परिसरातील करंजाळा येथे वीज कोसळून एक बैल दगावला तर तीन शेतकऱ्यांसह एक महिला जखमी झाली आहे.

    रविवार रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अचानक वादळी वारे वाहू लागले. ढगांचा गडगडाट सुरू होऊन मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वडीगोद्री परिसरातील करंजळा, अंतरवाली सराटी आदी भागात वादळी वारे व मेघगर्जने सह एक तास पाऊस झाला. करंजळा येथील गजानन काकासाहेब नांद्रे यांच्या गट नं १५१ मधील शेतात बैलगाडी ला बांधलेल्या बैलावर वीज पडून एक बैल दगावला. याचवेळी शेतात भूस भरत असलेले शेतकरी ज्ञानेश्वर नांद्रे,दीपक नांद्रे, ऋषी नांद्रे v सुलभा मिरकड या किरकोळ जखमी झाल्या. दुसरा बैल सुदैवाने वाचला. या मृत जनावरांची नुकसान भरपाई शासनाचे लवकरात लवकर द्यावी अशी मागणी या शेतकऱ्याने केली आहे.