Ticker

6/recent/ticker-posts

मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण समर्थनार्थ रोहिलागड कडकडीत बंद मराठा आरक्षणाला पाठिंबा



अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ 

    दि.२२ रोजी रविवार रोजी  अंबड तालुक्यातील रोहिलागड येथील मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी व्यापारी वर्गाने कडकडीत बंद पाळला. मनोज जरांगे पाटील यांचे सराटी अंतरवाली येथे सुरू असलेल्या उपोषणास पाठिंबा देऊन तरुणांनी  आपले मनोगत व्यक्त केले. तसेच सराटी अंतरवाली कडे जात असताना वडीगोद्री येथे अडवून काही मराठा तरुणांना मारहाण करण्यात आली तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा ओडून फाडण्याचा प्रयत्न करण्यात आला.यामुळे सदरील घटनेचा निषेध करून दिवसभर रोहीलागड बंद ठेवण्यात आले तसेच टायर जाळून निषेध करण्यात आला.रोहीलागड सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी तरुणांच्या वतीने गावात रॅली काडून घोषणा बाजी करण्यात आली.नंतर भाषणे करून आंदोलन संपविण्यात आले.यावेळी आरक्षणासाठी मराठा समाजाकडून एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, करेंगे या मरेंगे हम सब जरांगे, छत्रपती शिवाजी महाराज की जय, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो आशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

रोहिलागड गावातील सकल मराठा तरुणांनी यावेळी गर्दी केली होती.मराठ समाज आरक्षणासाठी सरकारने  वेळीच जागे होऊन योग्य दिशेने पाऊल उचलून मराठा समाजाला आरक्षण द्यावे. अशी मागणी यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली.