Ticker

6/recent/ticker-posts

माजी आमदारानी पुरग्रस्त भागाची पहानी !



प्रतिनिधि :- हितेश मेश्राम 

गोंदिया जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पावसाने नद्या-नाले तुडुंब भरून वाहत असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. या अनुषंगाने ग्राम पुराडा, ढीवरीनटोला येथे पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी उपस्थित सभापती सौ. सविता संजय पुराम. पुरामुळे आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रातील अनेक घरांची पडझड झाली असून शेतपिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. 

मी अधिकारी वर्गासोबत संपर्कात असून नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना केल्या आहेत.सोबतच पाऊस अजून काही तास सुरू राहणार असल्याची माहिती मिळाली असून एनडीआरएफ टीम सुद्धा बचावकार्यासाठी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.