गृहविभागाचे सहसचिव वैभव राजेघाटगे यांचे प्रतिपादन; निढळ ते वर्धनगड रस्त्याच्या दुतर्फा पाच हजार वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात
बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
पूर्वजांनी राखलेल्या कित्येक गोष्टींच्या जोरावर आपण आपलं आयुष्य मजेत जगत आहोत, मात्र भावी पिढीला आपण केवळ हासच देणार आहोत. भौतिक सुविधांचा विकास करताना कित्येकवेळा आपणच पर्यावरणाची मोठी हानी करत आहोत. त्यामुळे भविष्यात उद्भवणाऱ्या संकटांचा सामना करताना भावी पिढीला त्रास होऊ नये म्हणून शासन तसेच सामाजिक संघटना व ट्रस्ट यांच्या माध्यमातून वृक्षारोपण लावलेल्या वृक्षांचे संवर्धन अशी चळवळ उभी राहिली पाहिजे आणि या चळवळीत गावोगावचे नागरिक, शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवा-युवतीं, सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते यांनी मोठ्या हिरारीने सहभागी होऊन त्याचा प्रसार आणि प्रचार करून अधिकाधिक वृक्ष लागवड करण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहन गृहविभागाचे सहसचिव वैभव राजेघाटगे यांनी केले. पुसेगाव ता खटाव येथून जाणाऱ्या सातारा- पंढरपूर (लातूर) या राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा सुमारे १५ किलोमीटर अंतरात श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे ५ हजार वृक्षांचेरोपण करण्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ बोलत होते. येथील शासकीय विद्यानिकेतनच्या परिसरात नुकताच पार पडला. त्यावेळी तालुक्यातील बुध गावचे सुपुत्र आणि गृहविभागाचे सहसचिव वैभव राजेघाटगे बोलत होते .
यावेळी आमदार महेश शिंदे, संत तुकाराम महाराजांचे वंशज आणि पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे विश्वस्त शिवाजी मोरे, विभागीय वनाधिकारी हरिचंद्र वाघमोडे, देवस्थान ट्रस्टचे चेअरमन रणधीरजाधव, विश्वस्त डॉ सुरेश जाधव, संतोष (बाळासाहेब) जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव सहायक पोलीसनिरीक्षक संदीप पोमण तसेच वारकरी गुरुकुलचे सुळ महाराज, ग्रामस्थ, भाविक वृक्षप्रेमी तसेच वनविभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते. यावेळी पुसेगाव पोलीस ठाणे, नानासाहेब धर्माधिकारी ट्रस्ट, ज्येष्ठ नागरिक संघटना, विविध मंडळांचे कार्यकर्ते आणि युवकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
-पूर्वजांनी आपल्याला दिलेली1 गावोगावी वनराई व देवराई लोप पावत चाललेली ही संकल्पना उत्तर खटाव तालुक्यातील प्रत्येक गावात राबविण्यासाठी आणखी प्रयत्न करणारच आहे. सुरुवातीला पुसेगावातून जाणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गावर पुसेगाव ते वर्धनगड आणि पुसेगाव ते निदळ या रस्त्याच्या दुतर्फा वड, पिंपळ, चिंच, करंज, लिंब तसेच अन्य वृक्षांची लागवड करून सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने राबवण्यात आलेल्या उपक्रमाला देवस्थान ट्रस्ट सर्वोतोपरी सहकार्य करणार आहे. वनीकरण विभागाच्यावतीने वृक्षांच्या रोपांचा पुरवठा करण्यात येणार असून या वृक्षांची जोपासना, निगा व जबाबदारी सक्षमपणे श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यासाठी आ महेश शिंदे यांनी शासनाकडून सुमारे ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे.--रणधीर जाधवश्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट चेअरमन
वृक्षारोपण शुभारंभ करण्याअगोदर गावातील तसेच पंचक्रोशीतील नागरिक, युवक व विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांना येथील सेवागिरी मंगलकार्यालयात महेश शिंदे व शवाजी मोरे यांनी व्यसनमुक्तीची आणि वृक्षांची लागवड, जतन आणि संवर्धन याची शपथ दिली. देवस्थान ट्रस्ट च्या माध्यमातून या रस्त्याच्या दुतर्फा करण्यात येणाऱ्या वृक्षारोपणामूळे वृक्षप्रेमी तसेच पंचक्रोशीतील नागरिक तसेच या रस्त्याने येणारे जाणारे प्रवाशी यांनी समाधान व्यक्त केले आहे.





Social Plugin