मोहाडी तालुक्यातील मौजा नवेगाव बु. येथे बैलपोळ्याचा सण मोठ्या थाटात व उत्साहात सर्व बळीराजांच्या सहभागाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी आमदार राजुभाऊ कारेमोरे यांच्याकडून दुपट्ट्याचे वितरण करण्यात आले व उत्कृष्ट बैल जोडी आणि बैल जोडीची सजावट याकरिता नवेगाव बूज ग्राम चे सरपंच तृप्ती अमित तिबुडे यांचे कडून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक वितरित करण्यात आले
.यावेळी गावातील सरपंच तृप्ती अमित तिबुडे, उपसरपंच अंकुश चकोले, ग्रामपंचायत सदस्य जयकिसन शेंडे ,मंगेश पुराम, पूजा चकोले ,प्रतिभा बांते, सुषमा मेश्राम, काजल वाघाडे, तंटामुक्ती अध्यक्ष चिंतामण तिबुडे,श्रीराम शेंडे, वामन चकोले, विजय बांते, जसवंत तिबुडे, सूर्यप्रसाद तिबुडे,मोहन कोडवते, जागेश्वर तीबुडे , गौरीशंकर चकोले,योगेश्वर शेंडे,मारुती चकोले, चुनीलाल बावनकर, रामेश्वर तिबुडे, बापू बांते, ताराचंद शेंडे,अक्षय पुडके, संदीप चकोले, विक्रांत मोहतूरे, कल्याण मित्र बांते,विष्णुदास तिबुडे, महादेव मोहतूरे, मिताराम तिबुडे, कार्तिक चकोले , भिवा चकोले, परमेश्वर तिबुडे, संदीप भेलावे, दिवान टेकाम, गजानन तिबुडे, शंकर चकोले, योगेश्वर पटले, नरेंद्र मोहतुरे, दिनेश चकोले,श्रीकृष्ण शेंडे, भाऊदास चमलाटे व मोठ्या संख्येने गावकरी यांनी सहभाग घेतला. या संपूर्ण कार्यक्रम शांततेने पार पाडल्याबद्दल संपूर्ण ग्रामवासी यांचे सरपंच तृप्ती तिबुडे यांनी आभार मानले व समाजात किंवा गावात झालेल्या सणामुळे बळीराजांचे आपल्या बैलजोडी विषयीचे प्रेम व समाजात शांतता आणि सुव्यवस्था व एकता टिकविण्याचे कार्य पोळा सण साजरा करण्याच्या माध्यमातून आपल्या समाजात होते असे मत व्यक्त केले.





Social Plugin