पत्रकार किशोर म चव्हाण
पारंपारिक दृष्ट्या चालत आलेल्या बोधेगाव येथे बैलपोळा निमित्ताने सर्व शेतकरी बांधव आपले बैल घेऊन सुंदर अशी मिरवणूक बोधेगाव मध्ये काढण्यात आली. ढोल ताशाच्या गजरामध्ये बैलांची मिरवणूक मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली .
बैल धर्माचे प्रतीक असल्याकारणामुळे तो आपल्याला कष्टातून जमिनीतून मोती पिकवतो त्यावरती शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह चालत असतो त्यासाठी यात्याच्या कष्टाची परतफेड व उतराई होण्यासाठी शेतकरी त्याची पूजा करतात पोळ्याच्या अगोदर खांदा मळणी आंघोळ घालून त्यांची पूजा करतात या दिवशी त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य करून त्यांच्या ऋणातून मुक्त होतात यासाठी आजचा दिवस शुभ मानला गेलेला आहे. म्हणून महाराष्ट्रात आनंदाने हा सण साजरा करण्यात येतो .





Social Plugin